पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


भाग ७ वा.
---------------
जंगलसंरक्षण.

  हिंदुस्तान देशामध्ये अति प्राचीन कालापासून झाडझाडोऱ्याची समृद्धि कशी होती, हा देश झाडझाडोऱ्याचे समृद्धीस योग्य आहे कीं नाहीं, हल्ली त्याची स्थिति कशी आहे, व त्याचे संरक्षण कसे होत आहे, याचे वर्णन ह्या भागांत आहे.

भूगर्भशास्त्रकाल.

 अति प्राचीन काली म्हणजे हजारों लाखों वर्षांपूर्वी हिंदुस्तान देश झाडझाडोऱ्याने गजबजलेला होता, ह्यांत बिलकुल संदेह नाही. हिंदुस्तान देशभर जागोजागी दगडी कोळशांच्या खाणींचा शोध लागला आहे व अजूनही लागत आहे, हे ह्या गोष्टीची साक्ष देत आहे.* युरोपखंडांतील इंग्लंड वगैरे देशांमधील कोळशांच्या खाणींचा जो काल त्याहून थोडा अलीकडचा काल ह्या देशांतील कोळशांच्या खाणींचा आहे.

भूगर्भशास्त्रानंतरचा काल.

 हा काल म्हणजे पृथ्वीचे रूपांतर होता होतां तिला हल्लींचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतरचा होय. ह्याच कालांत हिंदुस्तान देशास

-----

 *मोठमोठाली जंगले जमिनीच्या पोटामध्ये गडप होऊन त्यांचा दगडी कोळसा बनला आहे असे भूगर्भशास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.