पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



११३

झाडे आणखी एका रीतीनें शुद्धीकरणाची क्रिया करीत असतात. मनुष्यांची वस्ती जेथे जेथे आहे, तेथे तेथे अनेक कारणांनी घाणीचे पदार्थ पडलेले असतात. ह्या पदार्थांवर पाणी पडले असतां घाण पाण्यामध्ये विरून ती जमिनीमध्ये मुरते; व आसपास तळीं, विहिरी असतात त्यांत झिरपून जाऊन त्यांतील पाणी अपायकारक करिते. परंतु अशा जागेवर झाडे असल्यास तीं वरील द्रव्ये आपल्या पोषणास शोषून घेऊन जमिनीत मुरलेले पाणी शुद्ध करितात.

 प्राण्यांच्या श्वासोच्छवास-क्रियेने हवेमध्ये उत्पन्न झालेल्या कार्बानिक आसिड वायूचे पृथक्करण करून झाडे हवा शुद्ध करितात. ह्या क्रियेवरून झाडांचा व प्राण्यांचा विलक्षण संबंध आहे असे दिसते. प्राण्यांचे उत्सृष्ट पदार्थ म्हणजे मलमूत्र, कार्बानिक आसिड वायु हे झाडांचे खाद्य होत. व झाडांचे उत्कृष्ट पदार्थ जे पाने, फळे फुलें, बिया व ऑक्सिजन वायु हे प्राण्यांचे खाद्य होत. मनुष्यांचे मलापासून जें सोनखत उत्पन्न करितात, ते भाजीपाल्यास व फळझाडांस उत्तम खत आहे हे सर्वांस माहीत आहेच. गुरांचे शेण हेही उत्तम खत आहे. प्राण्यांपासून जो कार्बानिक आसिड वायु उत्पन्न होता, त्यामधील कार्बन झाडे आपल्या पोषणास घेतात. व त्या योगानें जो ऑक्सिजन वायु उत्पन्न होतो तो प्राण्यांचे रक्ताचे शुद्धीस लागतो. सर्व प्राणी प्रत्यक्ष अगर परंपरेनें वनस्पतींवर उपजीवन करितात, हे उघड आहे. कित्येक प्राणी इतर प्राण्यांवर उपजीवन करितात हे खरे. परंतु हे दुसरे प्राणी प्रत्यक्ष अगर परंपरेनें वनस्पतींवर पोसलेले असतात. सारांश, झाडे प्रा-