पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/127

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११४

ण्यांकरिता किंवा प्राणी झाडांकरितां उत्पन्न केले आहेत ह्याचा निश्चय करणे फार कठीण आहे.

 हवा जास्त सुखकारक व हितकारक करण्यास झाडे आणखी एका रीतीने कारणीभूत होतात. आपणांस फार रुक्ष हवा उपयोगी नाहीं. रुक्ष हवेपासून आपणांस त्रास होतो. सोलापूर, नगर, विजापूर वगैरे जिल्ह्यांत पाऊस कमी पडतो, व झाडोराही कमी असल्यामुळे हवा फार रुक्ष असते. व उन्हाळ्यांत तर इतकी रुक्ष होते की, ती अगदीं असह्य वाटते. अशा दिवसांमध्ये एकाद्या बागेमध्यें अगर राईमध्ये गेलो असतां आपणांस फार आराम वाटतो. याचे कारण तेथे झाडांच्या योगानें थोडासा थंडावा असतो हें एक. परंतु, मुख्य कारण झाडांच्या व पाण्याच्या योगाने तेथील हवेमध्ये ओलावा असतो. ह्याकरिता आपल्या उष्ण देशामध्ये हवेत थोडासा ओलावा असला, तर ती आपणांस सुखावह वाटते. उन्हाळ्यामध्ये आपल्याकडील हवा फार रुक्ष असते व तिजपासून आपणांस फार त्रास होतो. मृग नक्षत्र लागण्याच्या सुमारास पश्चिम समुद्राकडून हवेचा प्रवाह वाहू लागतो, व तिजमध्ये थोडा बहुत ओलावा असल्यामुळे पाऊस जरी पडला नाहीं, तरी ह्या हवेपासून पुष्कळ आराम वाटतो. व अशी बाष्पयुक्त हवा वाहूं लागली म्हणजे लोक मृगशीतलाई पडली असे म्हणतात.

 दुसरी गोष्ट अशी की, अगदीं रुक्ष हवा असेल, तर तिजमध्ये कोणत्याच प्रकारची झाडे चांगली होत नाहींत. हवेमध्ये जितका ओलावा जास्त असेल तितकी झाडे चांगली होतात. उष्ण देश