पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१०५

न पडलीच पाहिजेत; तसेच, वर्षातून एक वेळां तरी झाडांस फुलें व फळे येऊन तीही गळून पडत असतात.

 झाडांच्या स्थूलमानाने पाहिले असता, त्यांची पाने व फळे हा त्यांचा बराच मोठा भाग आहे. आंब्यासारख्या कित्येक झाडांस फळे इतकीं येतात की, त्यांच्या योगानें फांद्या कित्येक वेळां मोडून पडतात. अशा रीतीने आपणांस झाडांपासून दर वर्षास त्यांच्या वजनाच्या मानाने बऱ्याच वजनाची पाने व फळे प्राप्त होतात. प्रत्येक मध्यम प्रतीच्या आंब्याच्या झाडाची पाने दर वर्षास पन्नास पौंड मिळतात असे धरूं, व दर एकरास सरासरीच्या मानाने १० झाडे धरूं. म्हणजे दर वर्षास एक एकर जमिनीमध्ये ५०x१०= ५०० पौंड वजनाचीं फक्त पानें निघतात.

 हीं पाने व फळे कुजून जे खत उत्पन्न होते ते उत्तम प्रतीचे होय. खनिज खतापेक्षा सेंद्रिय खताची मातब्बरी जास्त आहे. शिवाय झाडांच्या पानांमध्ये पोट्याश व सोडा ह्यांच्या क्षाराचेही प्रमाण पुष्कळ असते. आणि हे क्षार पिकांस फार जरूरीचे असतात. पानांमध्ये पोट्याश क्षाराचे प्रमाण इतके असतें कीं, पाने जाळून त्यांच्या राखेपासून पुष्कळ पोट्याश तयार करतात. झाडांच्या लाकडापासून खत तादृश प्राप्त होत नाही. कारण, लाकडामध्ये सेंद्रिय द्रव्ये फारच थोडी असतात, व कार्बन ( कोळसा ) याचेच विशेष प्रमाण असते. झाडे हा कार्बन जमिनीच्या द्वारे आपल्या पोषणास घेऊ शकत नाहींत. कार्बन जो झाडांस लागतो तो ती हवेमधून घेतात. ह्याशिवाय लाकूड लौकर कुजत नसल्यामुळे