पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१०४

असेल, तर विद्युत् उत्पन्न होऊन ढगांच्या आंगीं एकाच जागी जमण्याचा कल येऊन वादळ होते. व त्या योगाने एकाच जागी अतिशय पाऊस पडून पूर येतात व त्यापासून वर सांगितल्याप्रमाणे नुकसान होते. अल्पवृष्टीचा जो दुसरा प्रदेश त्यांत अशी स्थिति वारंवार आढळण्यांत येते. असा प्रदेश झाडांनी आच्छादित असला म्हणजे त्यापासून हवेमध्यें चोहींकडे ओलावा मिसळून वरून ढग जाऊ लागले म्हणजे त्यांचे लागलीच पाणी होऊन ते हलके हलकें खाली पडते. ढग एकाच जागी पुष्कळ जमून राहण्यास त्यांना अवधि सांपडत नाहीं. व झाडांच्या योगाने पाऊस चोहींकडे सारखा वांटला जातो.

खताची उत्पत्ति

 खताची उत्पत्ति, हा झाडांपासून फार महत्त्वाचा उपयोग आहे. सर्व झाडांची पाने दर वर्षी एकदां सर्व गळून पडतात, व त्यांस नवीं पाने येतात. पाने गळून पडण्याच्या संबंधाने झाडांचे दोन वर्ग आहेत. कांहीं झाडांची पाने एकदम सर्व गळून पडतात व त्यामुळे झाडे कांहीं दिवसपर्यंत अगदी खराट्यासारखी दिसत असतात, व नंतर त्यांस नवी पालवी फुटते. दुसरीं कांहीं झाडे अशी आहेत की, त्यांची पानें थोडथोड़ीं गळून पडतात; व नवी पालवी येण्याचे कामही त्याबरोबरच चालू असते. यामुळे ही झाडे खराट्यासारखी झालेली कधीच दिसत नाहींत; सदोदीत पानांनी युक्त अशीच दिसत असतात. परंतु सर्व पाने वर्षातून एकदां गळू