पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/116

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०३

झाडांच्या बुंध्याचा अटकाव झाल्यामुळे ते एकदम सोसाट्याने वाहात जात नाहीं. मग अर्थातच डोंगरावरील माती व लहानमोठे दगड हेही वाहून जात नाहींत. शिवाय झाडांच्या मुळांच्या योगाने माती, धोंडे वगैरे जणू काय बांधली गेली असतात त्यामुळे तीं घसरून येत नाहींत.*

 नदी, नाले यांच्या कांठच्या जमिनी फार मूल्यवान् असतात. परंतु त्यांच्या कांठांवर झाडे नसली, तर जमिनी पाण्यांत ढांसळून वाहून जाण्याचा संभव असते. म्हणून किनाऱ्यावर झाडे लाविली असता त्यांच्या मुळांनी जमीन बांधली जाऊन नुकसान होण्याचे टळते.

वादळास प्रतिकार.

 झाडांच्या योगाने, दुसऱ्या एका प्रकाराने मोठमोठे पूर येऊन नुकसानी होण्याचे टळते. डोंगर, माळजमिनी वगैरेवर झाडी नसून ती अगदीं उघडी असतील व हवा साधारण रुक्ष

-----

 *फ्रान्स देशांत ऱ्होन नदीस वारंवार पूर येऊन फार नासाडी होते. याचे कारण जंगलाचा नाश होय, हे सर्वत्र प्रसिद्ध आहे. अशा तऱ्हेचे पूर येऊन नासाडी न होण्यास काय उपाय योजावे, म्हणून वाटाघाट चालून नदीच्या सर्व खोऱ्यांंस बांधारे घालावे असे ठरले. परंतु या कामास खर्च किती लागेल ह्याचा अंदाज करण्यासाठी फ्रेंच इंजिनियरांनी पतकर घेऊन पाहिले तों जगांतील सर्व पैसा खर्च केला तरी हे काम व्हावयाचे नाही, असे त्यांच्या नजरेस आले. नंतर त्या ठिकाणी झाडे लावावी असे ठरून त्याप्रमाणे काम सुरू झाले.