पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१०२

खाली येतात. मग अशा उच्च स्थानाच्या पायथ्याशी जी शेते असतील त्यांची दशा कशास विचारावयास पाहिजे !! पिके जर असतील तर ती लागलीच दबलीं जाऊन दगडांची व मातीची वर भर पडावयाची. तसेंच, पाण्याच्या जोराच्या प्रवाहाने कित्येक ठिकाणी शेतांतील माती वाहून जाऊन मोठमोठाले चर पडावयाचे ! व थोडेच वर्षांत पूर्वी तेथे शेत होते की नाही ह्याचा पत्ता लागावयाचा नाहीं !! तसेच, त्या डोंगरावरचे पाणी एकाद्या तळ्यास जाऊन मिळावयाचे असल्यास, व तळे नजीक असेल तर त्यामध्ये ही वरील माती, रेती, धोंडे वाहात जाऊन तळ्याचा तास लौकर भरून जाईल. व कांहीं वर्षांपूर्वी ज्या तळ्यामध्ये विपुल पाणी रहात असे, ते राहण्यास जागा नसल्यामुळे ते तळे निरुपयोगी होईल. तसेच, नद्यांचे व नाल्यांचेही तास पहिल्यापेक्षा जास्त भरून जातील. खाड्यांचे तास अशा रीतीनें भरून गेले म्हणजे जेथपर्यंत पूर्वी मोठमोठालीं गलबते येत होती तेथे लहान होड्यासुद्धा येण्याची पंचाईत पडते. अशा तऱ्हेचा बोभाटा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वत्र ऐकू येतो. अशा रीतीनें डोंगरांवर झाडे नसली म्हणजे अनेक प्रकारचे नुकसान होते. तेच डोंगर जर झाडांनी आच्छादित असले तर हे वरील सर्व प्रकारेच नुकसान होण्याचे बंद होते. मुख्यतः हे सर्व नुकसान डोंगरावर पडलेले पाणी एकदम वाहून गेल्याने होते. परंतु डोंगरावर झाडे असतील, तर त्या योगाने डोंगर पोकळ होऊन पडलेले पाणी पुष्कळ अंशीं जिरते. व जे पाणी वाहून जाते त्यास