पान:हिंन्दू सम्राट्.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७८)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

त्यामुळे बाणेदार रजपूत समाजामध्ये त्या जोधपूर, जयपूर येथील राजां- विषयी तिरस्कार उत्पन्न झाला व तितक्याच प्रमाणांत प्रतापसिंहाबद्दल रजपूत जनतेचा आदर द्विगुणित झाला. त्यामुळे अनेक जात्याभिमानी व देशाभिमानी रजपूत सरदार प्रतापाच्या निष्कलंक झेंड्याखालीं जमा झाले.

 त्यानंतर दुसरा भाग म्हणजे अकबराने मेवाडांतील जो प्रदेश जिंकून तेथे आपली नवीन राज्यपद्धति सुरू केली होती, अर्थात् जेथे राहण्याने सुखशांतीला चढावलेल्या लोकांना स्वाभिमानाचा विसर पडणार होता, त्या प्रदेशांत राहूं नये, अशी सक्त तजवीज केली ! त्यामुळे मोगलांच्या तिकडील वसुलाला चांगलाच चट्टा बसला. मोंगली फौजेसाठी पैसा व धान्य दिल्लीहून आणण्याची पाळी आली आणि तेही वाटेंत रजपुतांनी लुटल्यामुळे मोंगल फौज हैराण होऊं लागली. अकबराला आणखीही थोडें नुकसान पोचविण्यासाठी 'प्रतापाने' सुरत बंदराकडून होणा मोंगलांच्या व्यापाराचे सर्व रस्ते रजपत व भिल्ल ह्यांचे साह्याने रोखून घरले. त्यामुळेही बादशहाचें नुकसान होऊं लागले. त्यानंतर झालेल्या प्रत्यक्ष युद्धांच्या हकिगती मात्र विस्तार - भयास्तव येथे देत नाही. स्वातं- व्यासाठी झगडणारा प्रताप, त्याचा प्रधान भामशा व लोकप्रतिनिधि चंद्रावत असे राष्ट्रपुरुष धन्य होत !

 ज्यांना धकाधकांच्या ह्या मामल्यांत पडतां येत नव्हते, असे लोकही ह्या राष्ट्रपुरुषांचें सानंद कौतुक करून त्यांचे सुयश चिंतीत होते. दिल्लीच्या दरबारांतून 'पृथ्वीसिंह' नामक एक रजपूत सरदार प्रतापला लिहितो—

 ".... यह दशा सर्वदा नहीं रहेगी । एक दिन समस्त राज जाति प्रताप के चरण चुमेगी | आर्यों को पुनः उन्नति के शिखरप पहुंचाने का मान प्रतापही प्राप्त करेंगे.."