पान:हिंन्दू सम्राट्.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(७९)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्.

(१४) छत्रपति शिवाजी महाराज.

( जन्म इ० स० १६३० मृत्यु १६८० )


 “महापुरुष अपने युगकी प्रवृत्तियोंका प्रतिनिधि है, विचारधाराओं का प्रतिबिंब है । वह युगका जहाँ पुत्र है, वहाँ उसका निर्माता भी होता है।

-पंडित व्यंकटेश नारायण तिवारी.


 पुणे जिल्ह्यांतील शिवनेरी किल्ल्यावर इ० स० १६३० * सालीं शिवाजीचा जन्म झाला. त्याच्या बापाचें नांव शहाजी राजे भोसले आणि आईचें नांव जिजाबाई असें होतें. शहाजीला विजापूर दरबारकडून पुणे प्रांतांत एक जहागीर मिळाली असून, तो स्वतः विजापूरकरांतर्फे कर्नाटकां- तील स्वारीवर नेहमी असल्यामुळे त्या जहागिरीची व्यवस्था पाहण्या- साठी त्याने दादाजी कोंडदेव नामक गृहस्थास पुण्याला ठोवलें होतें.. शिवाजी आणि मातुश्री जिजाबाई तेथेच रहात असत. दादोजीने त्या जहागिरीची उत्तम व्यवस्था लावून उत्पन्न वाढविलें. तसेंच शिवाजीला घोड्यावर बसणे, दांडपट्टा खेळणें व नेम मारणे वगैरे सरदारांच्या मुलांना अवश्य असे शिक्षण दिलें. जहागिरीचा कारभार व न्याय वगैरे कामें कर- तांना त्याला जवळ बसवून त्याविषयी प्रत्यक्ष बरीच माहिती करून दिली. मातुश्री जिजाबाई आपल्यापरी रामायण व महाभात ह्यांतील आदर्श पुरुषांच्या गोष्टी सांगून त्याचे बालमनावर उदात्त संस्कार करीत असे.


सन १६३० जेधे शकावलीप्रमाणे मानला जातो. रियासतकार श्री०- सरदेसाई, शके १५४९ सन १६२७ देतात..