पान:हिंन्दू सम्राट्.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राष्-पुरुष.

(७७)

 अकबरासारख्या धूर्त परकी राज्यकर्त्याने स्थापलेले राजकीय ऐक्य आणि सुराज्य ह्यांच्या घटोत्कची बाजारामध्ये कांही लोक भुलून जाणे साहजिकच होतें. 'दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा' असे म्हणून अकबरापुढे लाळ घोटणारे रजपूत राजे हे अशा लोकांत गणतां येतील ! वैदिक वाङ्मयामध्ये लोकांना स्वस्थितीचा विसर पाडणाज्या ह्या राज्यपद्धतीला त्या वेळच्या विचारी राष्ट्रपुरुषांनी 'आसुरी' असे नांव दिले आहे. खरोखर दारिद्र्य वाढत असून, आपण सुखी होत चाललो आहों; तसेच वास्तविक कांहीच ज्ञान न मिळतां आपण सर्वच लोक मोठे सभ्य आणि विद्वान् झालों आहोंत; असा लोकांना भास हो, त्य होणें, हैं त्या राजनीतीचें लक्षण होय !

 स्वाभिमानी आणि दक्ष असे राष्ट्रपुरुष मात्र ह्या जाळ्यांत न गुरफटतां तें तोडून टाकण्याच्या उद्योगाला लागतात. मेवाडचा वीर प्रताप हा तत्कालीन राष्ट्रपुरुषांचा नेता होय. त्याला सम्राट् किंवा महाराणा न म्हणतां राष्ट्रपुरुष म्हणून संबोधणें अधिक उचित होईल; कारण एकतर त्याच्या बापाच्या वेळीं सर्व देश अकबराने जिंकल्यामुळे त्याला अरवली पर्वताच्या डोंगराळ भागांतच रहावें लागले होतें. तसेंच त्याला मिळालेले राज्यपद केवळ वारसदारीने किंवा तरवारीच्या बळावर मिळाले नसून, त्याच्या अंगच्या अनेक सद्गुणांमुळे त्याच्या भावाला पदच्युत करून स्वातंत्र्यप्रिय रजपुतांनी त्याला आपला राजा किंवा नेता म्हणून निवडले होतें.

 आता अकबराच्या अनेक युक्त्यांना तोंड देऊन आणि नंतर अनेक घनघोर लढाया करून 'प्रतापा'ने देशाचें स्वातंत्र्य कसें रक्षण केलें, हें आपण पाहूं. प्रथमतः शरीरसम्बन्ध जोडून रजपुतांचे पाठबळ मिळ विण्याचा जो डाव अकबराने टाकला होता, तो त्या स्वाभिमानशून्य लोकांवर जातीय बहिष्काराचें शस्त्र धरून प्रतापाने उलटून टाकला !