पान:हिंन्दू सम्राट्.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७६)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्

भिन्नधर्मी आणि भिन्न संस्कृतीच्या लोकांवर मिळवलेल्या राजकीय वर्चस्वाचा अभिमान शहाणपणाच्या आवरणाखाली नेहमी दबून राहणे कठीणच आहे. तो केव्हा आणि किती उसळी मारील ह्याचा नेम नसतो !

 राणा उदयसिंहाचा पराभव करून चितोड जिंकल्यावर अकबराने तेथे केलेल्या कत्तलीमध्ये आणि हरएक वस्तूच्या व रजपूत कलाकौशल्याच्या राक्षसी विध्वंसामध्ये हाच ताठा, निष्ठुरता व पाशवी शक्तीचा दिमाख दिसून येतो. औरंगजेबाने तर ह्या बाबतींत कमाल मर्यादाच गाठली ! असो.


होऊं लागलाही होता. एकराष्ट्रीयत्वाच्या उच्च भावनेने प्रेरित होऊन जर मुसलमान राज्यकर्त्यांना सामान्य लोकांच्या भावनांची जोपासना केली असती, तर किती ना
मी झाले असते ? 'रसखान' ह्या मुसलमान कवीचे उद्द्वार पहा-

पत्थर हों तो वही गिरि को जु कियो व्रज छत्र इंद्र कारन ।
जो खग होउँ बसरो करौं वही कालिंदी कूल कदंव की डारन ॥

 ह्या कवितेवरून कवीचे मनांत कालिंदी-यमुना नदीबद्दल तसेंच गोवर्धन पर्वताबद्दल अतिशय प्रेम असले पाहिजे, हे उघड आहे. तर मग आणखी थोडे पुढे गेल्यानंतर 'मातृभूमि' हीच भावना उत्पन्न होणार नाही काय ?

 कवि महंमद जायसी म्हणतो - हिंदूद्दी मुसलमानांप्रमाणेच देवाचे पुत्र-कन्या होत. म्हणून त्यांच्या धर्माची निन्दा करूं नका; आदर बाळगा.

तिन्ह संतति उपराजा भाँति भाँति कुलीन ।
हिंदू रक दुन भये अपने अपने दिन ||