पान:हिंन्दू सम्राट्.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राष्ट्रपुरुष.

(७५)

सम्बन्ध हा एक महत्त्वाचा भाग होय. सक्तीच्या खुशीने आप्त बनविले- ल्या रजपूत राजांस मोठ्या देणग्या व बादशाही नोकन्या देऊन त्यांच्या क्षात्रतेजाचा उपयोग कधी इतर हिंदु राजांविरुद्ध तर कधी जुन्या अफ- गाणांविरुद्ध त्याने करून घेतला. तसेंच प्रजेचीं अंतःकरणें झुलवीत ठऊन, तिला आपल्या गतवैभवाचा आणि नैसर्गिक हक्कांचा विसर पाडण्यासाठी उभारलेले 'दीने इलाही' धर्माचें गारूडही त्याच प्रकारांत मोडणारी विलक्षण युक्ति होय ! ( कारण त्या धर्माच्या आद्य गुरुचें काम तो स्वतःच करी; पण त्या नव्या धर्मावर त्याचा स्वतःचा फारसा विश्वास नव्हता. ) त्या अजब नाटकामुळे फसून जाऊन बिरबल व तानसेन ह्यांच्यासारखे थोर हिंदु पुरुष स्वधर्माला मुकले. तानसेनाच्या ह्या धर्मांतरामुळे भारतीय गायनपद्धतीवर मुसलमानी शिक्का बसणे सुलभ झालें. नंतर त्या अभिनव अशा प्रयोगाचा तिसरा भाग म्हणजे अकबराने स्थापिलेली शांतता आणि सुव्यवस्था कडव्या अफगाणांच्या सुलतानी अंमलाखाली जेरीस आलेल्या प्रजेला त्याची राज्यपद्धति म्हणजे दैवीं देणगीच, असे वाटणे साहजिकच होते. दुसरे असे की, मोंगल बादशहांचें समर्कद बुखारा इकडील मूळ केव्हाच तुटलें होतें. त्यामुळे त्यांची उपरी- पणाची दृष्टि कांहीशी कमी झाल्याने त्याचाही परिणाम देशस्थितीवर इष्ट असा झाला. ते दिल्लीला राहूं लागल्यामुळे ह्या देशांतील संपत्तीचा ओघ बाहेर गेला नाही, हीदेखील एक इष्टापत्तीच मानली पाहिजे ! घुणाक्षरी न्यायाने का होईना, ही व्यवस्था व एकछत्री अंमल पुढेही नीट चालता, तर कांही काळाने ह्या देशांत हिंदु-मुसलमानांचें संयुक्त, समर्थ आणि संपन्न असें एक राष्ट्र निर्माण झाले असतें ! x परन्तु परकी राज्यकर्त्यांचा

x पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये कित्येक विचारी मुसलमानांच्या मनांत हिंदभूमि व हिन्दु बांधव... ह्यांच्याविषयी आपलेपणा उत्पन्न

[टीप पुढील पृष्ठावर पहावी.]