पान:हिंन्दू सम्राट्.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७४)

हिंदुस्थानचे हिन्दु सम्राट्

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्

(१३) राष्ट्र- पुरुष

आणि परकी सुराज्याचें अतरंग.

 आतापर्यंत बऱ्याच हिंदु साम्राटांची उद्बोधक व अभिमानास्पद चरित्रे आपण पाहिली आणि त्यांच्या अनुषंगाने इतरही अनेक घटनांचें ओझरतें अवलोकन आपण केले. त्यानंतर ह्या प्रकरणांत त्या प्रकारचें एखाद्या हिंदु राजाचें चरित्र द्यावयाचें नसून, देशामध्ये दृढमूल होऊं पाहणाऱ्या एका परकी राजसत्तेने मोठ्या कुशलतेने सुरू केलेला सुराज्यस्थापनेचा प्रयोग आणि त्या प्रयोगाच्या अंतरंगांतील मक्खी ओळखून त्या परकी सत्तेचा डाव उधळून लावण्यासाठी स्वातंत्र्यप्रिय राष्ट्रपुरुषांनी चाल- विलेली लढत, ह्यांविषयी थोडेंसें विवेचन करावयाचें आहे.

 सोळाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत सुमारे तीनशे वर्षांमध्ये कडव्या पठाण वगैरे मुसलमान राजांनी आपल्या करड्या अंमलखाली हिंदूंना दाबून टाकण्याचे यत्न करून पाहिले; परन्तु ह्या देशाचा अफाट विस्तार व हिंदूंचे प्रचंड संख्याबल ह्यामुळे त्यांचा उद्देश तडीस गेला नाही. शिवाय मेवाडचे महाराणे व विजयनगरचे सम्राट् इत्यादिकांकडून त्यांना जोराचा प्रतिकारही होत असे. तसेंच मुसलमानांतसुद्धा कित्येक जमाती असून, त्यांच्यांतही सत्तेसाठी स्पर्धा चालू होतीच. हे सर्व पाहून अकबरा- सारख्या धोरणी बादशाहाने आपले वर्चस्व स्थापण्याची व टिकवण्याची एक नवीनच दिशा योजिली !

 अकबराच्या ह्या नवीन प्रयोगांपैकी रजपूत राजांशी जोडलेला शरीर-