पान:हिंन्दू सम्राट्.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सम्राट् कृष्णदेवराय तुळुष.

(७३)

दायाचे गुरु व्यासतीर्थ व शृंगेरीचे शंकराचार्य ह्यांना अनेक भूमिदानें दिलीं. कांही राजांनी अन्य लोकांना मशिदीव चर्च बांधण्यासाठीहि देणग्या दिल्या होत्या ! बहुतेक राजे प्रजावत्सल व जुन्या परंपरेचे अभि मानी असल्यामुळे त्यांची सत्ता प्रजेला सुखदायक झाली. साम्राज्याचें अंतर्गत स्थैर्य व शांतता प्रायः ग्रामव्यवस्थेवर अवलंबून होती. ग्रामसंस्थां तून सेनवोवस आणि शेट्टी नामक ग्रामस्थ प्रमुख असत आणि ते वसुलाचे व न्यायाचे काम सरकारी अधिकाऱ्यांना सल्ला व मदत देत.

 सामान्यतः ह्या साम्राज्याची अखेर रामराजाचे कारकिदाँत ( इ० १५६५ त ) झाली असे मानितात. त्यामुळे रामराजाची अपात्रता भासूं लागते; परंतु त्या अपेशी राक्षसतागडीच्या युद्धापूर्वी रामराजाने केलेले अनेक पराक्रम व डावपेच लक्ष्यांत घेतले, म्हणजे त्याची योग्यता कळून येते.. यादगिरी, कल्याणी वगैरे त्याने काबीज केलेलीं ठिकाणें पाहिलीं, तर कृष्णरायाच्या सीमेच्या पुढेदेखील त्याने साम्राज्याची हद्द व दरारा स्थापन केला होता, असें सिद्ध होतें व तो उत्कर्ष सहन न झाल्यामुळेच करून पानिपतप्रमाणे रामराजाशीं सान्या मुसलमान शत्रूनी जूट निकराचा सामना केला होता. परन्तु तो वज्राघात सहन करूनही महाराष्ट्रांत 'शिवछत्रपति' जन्मास येईपर्यंत त्या राज्याने हिंदु संस्कृतीला. आधार दिला.