पान:हिंन्दू सम्राट्.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७२)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्

 गोपुर आणि हंपी येथील मनोरे इत्यादि अनेक भव्य व सुंदर बांधकामें करून आपलें स्मारक ठेवलें आहे! एकाच पाषाणांतून अठरा फूट उंचीची नृसिंहाची भव्य मूर्ति खोदून काढली असून तीं प्रेक्षकाला आजहि भग्नावस्थेंत थक करून सोडते! यशोमंदिरांतील विविध रंगांमध्ये काढिलेलीं चित्रे फारच प्रेक्षणीय आहेत ! कृष्णरायाने हंपी येथे कृष्णपुरम् नांवाची पेठ आणि होस्पेटजवळ नागलापूर म्हणन एक नवनि शहरहि वसविलें होतें, आजही त्यांचे अनेक अवशेष पहावयास मिळत आहेत.

 कृष्णराय राज्य करीत असतां 'दोमिंगो पाएस' नांवाचा पोर्नुगीज व्यापारी इकडे आला होता, तो म्हणतो-'कृष्णराय शूर व राजकारणी असून उदार होता. त्यामुळे त्याचेवर लोकांचें प्रेम असे. त्याचें शरीर भव्य आणि रुबाबदार होतें. त्याचे सरदार व मांडलीक त्याला वचकून असत.’’

 तत्कालीन हिंदुस्थानांतील राजांमध्ये त्याच नेबर बराञ्च वर लगेलः, उदेपूरचा महाराणा संग हा कृष्णरायाचा समकालीन राजा होता. ਫਚ राजा आठवा हेन्री ह्याचेशीं कोणी त्याची तुलना करतात; पण विद्वत्ता व धर्मगुरूंविषयी पूज्यभाव इत्यादि बाबतींत कृष्णराय हेन्र्रापेक्षा थोर होता, यांत संशय नाही. मोंगल बादशहांतील शहाजहानप्रमाणे दक्षिणेंत सम्राट् कृष्णराय हा वैभवशाली होऊन गेला.

 सम्राट् कृष्णदेवराय १५३० मध्ये स्वर्गवासी झाल्यावर तो निपुत्रिक असल्यामुळे त्याचा भाऊ अच्युतराय गादीवर बसला.

 विजयनगरच्या कुहुनेक सबै सत्रादूनी आपणांपुढे धर्मरक्षण हेंच ध्येय प्रामुख्याने ठेवलें होतें. शैव, वष्णव, जैन, मुसलमान व ख्रिस्ती अशा सर्व धर्माच्या लोकांना त्यांनी समतेने वागविलें.सम्रट कृष्णरायाने स्वसांप्र


  • कृष्णरायाला 'तिरुमल' नामक एक पुत्र होता; परन्तु तो बालवय‘तच मरण पावला होता.