पान:हिंन्दू सम्राट्.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सम्राट् कृष्णदेवराव तुळुव

(७१)

अशा हुद्दयांचे अधिकारी असत. ते सरकारी वसूल व सैन्यभरती वगेरे कामें करीत. खर्च वजा जातां शेतीच्या उत्पन्नाचा एक षष्ठांश कर घेत. कृष्णरायाने शेती सुधारणेकडे चांगलें लक्ष्य दिलें. तुंगभद्रेचा विख्यात कालवा, कोरागलबंधारा व सोंडूरचा तलाव हीं कामें त्यानेच केलीं होतीं. शेतीप्रमाणे हिन्यांच्या व इतर खाणी चालविणें, किना-यावरील समुद्रांतून मोतीं काढणें इत्यादि धंद्यांनाही त्याने उत्तेजन दिलें. कालिकत, मंगळूर इत्यादि बंदरांतून चीन, पेगू मलाया, पोर्तुगाल इत्यादि देशांशीं ह्या साम्राज्याचा व्यापारही फार मोठा चाले. त्यापासून होणारें जकातींचें उत्पक्षही चांगलेंच होतें. व्यापारवृद्धीसाठी आणि विजापूरच्या बादशहाला जरूर तेव्हा शह देण्यासाठी कृष्णराय पोर्तुगीजांना सलोख्याने वागवी. विजयनगर राजधानी फार विस्तृत व सुंदर होती. 'निकोलो दि कोंती' नामक प्रवासी त्या शहराचा घेर साठ मैल असल्याचें सांगतो. 'दोमिंगो पाएस'च्या मताने राजधानींत एक लक्ष घरें होतीं. म्हणजे लोकसंख्या सुमारें पांच लक्ष असावी. इराणच्या राजाचा वकील अबदुल रझाक म्हणतो-

 'विजयनगरसारखे सुंदर व संपन्न शहर कधी कोणी पाहिलें नसेल किंवा ऐकलेंही नसेल ! '

 सम्राट् कृष्णराय विद्वान् व कलेचा भोक्ता होता. त्याने 'ज्ञानाचेंतामणि' व ‘रसमंजरी' हे संस्कृत ग्रंथ आणि 'आमुक्तमाल्यदा' नामक तेलगू प्रेथ लिहिला आहे. त्याच्या राजसभेत तिम्मणा व कुमार सरस्वती इत्यादि अनेका कानडी व तामीळ वगैरे कवि होते. श्टंगेरीच्या गुरूंनी तत्वज्ञान व संगीत ह्या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले, क्या सर्वावरून त्या वेळची साहित्यरचना व प्रगति समजते. उत्कृष्ट शिल्प आणि खोदकाम हें तर *विजयनगर' साम्राज्याचें वैशिष्टय होय !

 कृष्णरायाने हजार रामाचें व कृष्णस्वामीचें मंदिर, विरूपक्षाचें प्रचंड