पान:हिंन्दू सम्राट्.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७०)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्

 सम्राट् 'वीर नरसिंह' ह्याचे मागून त्याचा धाकटा भाऊ 'कृष्णदेवराय' इ० स० १५०९ सालीं राज्यारूढ झाला. त्याने राज्यप्राप्तीनंतर दोन वर्षे अंतर्गत व्यवस्था व राज्याची मजबुती ह्या गोष्टींकडे लक्ष्य दिलें. पुढे सन १५५१ मध्ये म्हैसूरच्या गंगराजावर स्वारी केली. श्रीरंगपट्टण, उम्मतूर इत्यादि ठिकाणें काबीज केलीं आणि गंगराजाला आपला मांडलिक बनवून त्याचे दरबारी आपला एक प्रतिनिधि ( रोसडेंट ) ठेवून सम्राट् कृष्णरा राजधानीला परत आला. ओरिसा प्रांताचा राजा विजयनगरच्या सीमेवरील प्रदेशांत आपले वर्चस्व स्थापण्याच्या विचारांत होता. त्याची हालचाल पाहून कृष्णरायाने त्याजवर हल्ला केला. अनेक चकमकी झाल्या. शेवटच्या लढाईत त्याचा पूर्ण पराभव होऊन त्याने कृष्णरायाचें मांडलिकत्व कबूल केलं ! ह्या विजयाच्या स्मरणार्थ 'पोट्टनुरू' नांवाच्या गावीं कृष्णरायाने एक कीर्तिस्तंभ उभा केला आहे. ह्यानंतर मुसलमान शत्रूची पाळी आली ! प्रथम कलबुर्गा येथील मुसलमान सुलतानाकडे कृष्णराय वळला. तेथील तीन शहाजादे ( राजपुत्र ) त्याने पकडले. नंतर त्यांपैकी एकाला आपल्या तर्फेने तक्तावर बसवून दोघांना आपल्याबरोबर नेलें.

 ह्या स्वारीनंतर १५२० मध्ये कृष्णरायाने तुंगभद्रा उतरून 'रायचूर' दुआबावर स्वारी केली. आदिलशहाला ही खबर लागतांच तो त्वरेने येथे येऊन पोचला; परंतु रायाने त्याच्या फौजेचा अगदी धुव्वा उडविला ! पुढे विजापूरच्या रोखाने चाल करून पुष्कळ लूट घेऊन कृष्णराय विजय- नगरला परत आला. रायचूर दुआब जिंकल्यामुळे त्याची सरहद्द कृष्णानदी पर्यंत जाऊन पोचली ! अशा प्रकारें त्याच्या राजवटीमध्ये विजयनगरच्या हिंदुसाम्राज्यसत्तेचा परमोत्कर्ष झाला.

 राज्यव्यवस्थेच्या सोयीसाठी ह्या साम्राज्याचे उदयगिरी, पेनुगोंडा व तुळुव इत्यादि सहा विभाग केले होते. त्यांचेवर नायक, गौड व ओडियर


  • एका तेलगु कवितेच्या आधारे १४८७ इ० जन्मकाल ठरला आहे.