पान:हिंन्दू सम्राट्.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)

 जाणिवेने भागत नाही. प्राचीन परंपरेचीही आठवण करून द्यावी लागते. प्रस्तुतच्या पुस्तकाने ही सार्वराष्ट्रीय भावना निर्माण होण्यास सहाय्य होईल, यांत शंका नाही.

 यावर कोणी म्हणेल की, सार्वराष्ट्रीय भावना उत्पन्न होण्यास नुसत्या हिंदु सम्राटांस आवाहन काय म्हणून? याचें एक उत्तर वर दिलेंच आड़े की, 'हिंदु सम्राटांचा विसर पडण्याजोगी सध्याची शिक्षणपद्धति आहे म्हणून.' दुसरें असें की, सार्वराष्ट्रीय ऐक्याची जाणीव असतांहि, एखाद्या प्रसंगाने हिंदुधर्मरक्षकांचंच तेवढे स्मरण करणें हा गुन्हा होतो कीं काय ? त्यांतून या धर्मरक्षक सम्राटांनी धर्माधतेने राष्ट्रीय ऐक्यास विघातक कृत्यें केलीं असतीं, तर गोष्ट वेगळी. हिंदु सम्राटांनी धर्माच्या नांवाखाली परधर्मीयांवर जुलम केले नाहीत, मशिदी वा मठ उद्ध्वस्त केले नाहीत, गांवें बेचिराख केलीं नाहीत, जिझिया बसविला नाही, विहिरींत पाव टाकून कोणास बाटविलें नाही! उलट मशिदींस देणग्या दिल्या, बौद्धधर्मियांस आश्रय दिला व अगदी विसाव्या शतकांतहि युरोपियनांना साधणार नाही, इतक्या व्यापक व उदार अंतःकरणाने कृष्णदेवराय तुळवासारख्यांनी बौद्ध, लिंगायत, जैन, नास्तिक या सर्वांना आपल्या दरबारांत व राज्यांत बोलावलें. अशा उदार बुद्धीच्या पुरुषश्रेष्ठांनी, इतरांनी संकुचित बुद्धीने हिंदु धर्मावर आणलेलीं संकटें देहदंड सोसून मागे सारली आपला पाणीदारपणा जगाच्या प्रत्ययास आणून दिला. अशा सर्व पुरुषांना एका मालिकेंत बसवून त्यांचें स्मरण करावयाचें नाही, तर काय राजकीय ऐक्याचें नाटक साधण्यासाठी सकाळीं उठल्याबरोबर जय रुद्रदामनम् , जय अलाउद्दीन खिलजी, जय राजा मानसिंग, जय राघोबा दादा, जय लॉर्ड क्लाइव्ह, जय लॉर्ड डलहौसी, असा जयघोष सुरु करावयाचा !

 हिंदुस्थानांच्या हिंदु सम्राटांचें स्मरण केलें, म्हणजे हिंदुस्थानांतील अहिंदु