पान:हिंन्दू सम्राट्.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७)

 करण्याची पद्धत व अभ्यासलीं जाणारीं अनेक पाठ्य पुस्तकें अशीं सदोष आहेत की, हिंदुस्थानचा इतिहास वाचणाराच्या मनांत स्वतःबद्दल अवहेलना वाटू लागावी. हा न्यूनतागंड काढून टाकण्यास प्रस्तुतचें पुस्तक उपयोगी पडेल, यांत शंका नाही.

 हिंदू सम्राटांची निवड करतांना त्यांत प्रांताभिनिवेश नाही. त्यांत मागध आहेत, राजपूत आहेत, राष्ट्रकूट आहेत व तुळुवही आहेत. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांतून एकमेकांविषयी आपलेपणाची भावना उत्पन्न होण्यास प्रत्येक प्रान्ताने संस्कृतिसंरक्षणासाठी कोणकोणतें कार्य केलें, याची माहिती करून घेतली पाहिजे. इंग्रजांनी हिंदुस्थानला इ०स० १९३५ च्या कायद्याने ‘प्रांतिक स्वायत्तता' देण्याच्या आधीच कित्येक वर्षे आपण निराळ्या अर्थाने प्रांतिक स्वायत्तता अनुभवीत आहोंत; ही प्रांतिक स्वायत्तता म्हणजे मुंबईच्या चाळींत ज्याप्रमाणे शेजारशेजारचीं बिऱ्हाडें एकमेकांशीं परक्याप्रमाणे तुसडेपणाने वागतात, तसे मराठी, कानडी, तेलगु, तामिळ, मल्याळी, गुजराथी, हिंदी, बंगाली, उडिया या भाषा बोलणारे लोक जणूं काय आपला एकमेकांशीं कांही सग्बन्ध नाही, अशा पद्धतीने आपले छोटे संसार एकलकोंडेपणाने करीत आहोंत! इंग्रजीद्वारा एकमेकांचा एकमेकांस परिचय होतो व आजच्या राजकीय परिस्थितींत सर्वांचीं सुखदुःखे एकसारखीं असल्याने राष्ट्रीय सभेसारख्या ठिकाणीं आपण आपल्या राष्ट्रीय ऐक्याचा उचार व आचारही करतों; पण ही ऐक्याची भावना वृत्तींत किती मिसळती आहे, हैं पहावयाचें असल्यास गुजराथ्यास 'शामळो,' कानड्यास 'इड्डुगुड्डु' बंगाल्यास 'रसगुल्ला ' अशीं नांवें ठेऊन आपण किती चांगले आहोंत, अशी प्रौढी कशी मारली जाते, हें थोडेंसें लक्ष्यांत घ्यावें. ही परप्रान्ततुच्छतेची भावना जावयाची असल्यास सर्व हिंदुस्थानभर हिंदुसंस्कृतीसाठी रक्तसिंचन करणा-या थोर पुरुषांचें एकाच सरणींत स्मरण करावयास हवें. जिव्हाळ्याचें प्रेम उत्पन्न होण्यास नुसत्या सद्यःकालीन हितैक्याच्या