पान:हिंन्दू सम्राट्.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६८)

हिंदुस्थानचे हिन्दु सम्राट्ः

हिंदुस्थानचे हिंदु सम्राटू.

१२) समूट कृष्णदेकराय तुळुव

(इ० स० १५०९-१५३०)


 हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांमध्ये आणि निरनिराळ्या कालविभागांमध्ये होऊन गेलेल्या अनेक हिंदु सम्राटांच्या चरित्रांविषयी क्रमाक्रमाने आपण आतापर्यंत विचार केला. ते सर्व थोर थोर राजे कृष्णानदीच्या उत्तरेकडचे प्रदेशांत होऊन गेले आहेत. महाभारतकालापासूनहि बहुतक मोठमोठों राज्यें पंजाब आणि गंगा नदीच्या काठचा प्रदेश ह्यांमध्येच स्थापन झालेलीं दिसतील. असो. अत्यंत चंचल म्हणून प्रसिद्ध असलेली लक्ष्मी-साम्राज्यलक्ष्मी-नांदण्याचें भाग्य इतर प्रांतांप्रमाणे कर्नाटक प्रांतालाहि एका कालीं प्रास झालें होतें ! उत्तरेकडील बहुतेक हिंदु राजे ज्या वेळीं मुसलमानी सत्तेच्या दडपणाखाली दवून गेले होते, त्या वेळीं हिंदु संस्कृतीचें रक्षण करण्यासाठी तुंगभद्रा नदीचे काठीं 'विजयनगरचें हिंदु साम्राज्य' स्थापन झालें! त्या साम्राज्याचा वैभवशाली अधिपति कृष्णराय ह्याचें चरित्र ह्या प्रकरणांत देत आहों.

 चौदाव्या शतकांत दक्षिण हिंदुस्थानांत देवगिरी, वारंगूळ, द्वारसमुद्र आणि मदुरा अशीं चार मोठीं हिंदु राज्यें होती. त्यांपैकी देवगिरीचें राज्य इ° स० १३१२ सालीं मलिक काफूर नामक दैलीच्या सरदाराने खालसा करून पुढे वारंगूळ, द्वारसमुद्र आणि *ड ह्या राज्यांवरहि स्वा-या केल्या आणि थेट रामेश्वरपर्यंत इस्लामी चांद मिरवला. * महंमद तघलघाने-


  • इ° स° १३३४ ह्या वर्षी महंमद उंबलघाने कंपिली एथील हिंदु राजास मारून त्याचे अकरा मुलगे बाटवून टाकले.