पान:हिंन्दू सम्राट्.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धार्मिक आन्दोलन

(६७)

त्याने हिन्दु-मुसलमानांनी वैरभाव विसरून ईश्वराची भक्ति कोणत्याही मार्गाने करावी, मुसलमानच कांही देवाचे लाडके नाहीत, इत्यादि प्रकारचा उपदेश केला. परन्तु हें समतेचें तत्वज्ञान जेतेपणाचा अहंकार असलेल्या दिल्लीच्या बादशहांना कसें रुचावें ? त्या वेळच्या सुलतानाने कबीराच्या ह्या गुन्ह्याबद्दल त्याला कार्शीतून घालवून दिलें !

 एकंदरीने विचार करतां कबीर, कमाल, सुलतान अली, रहीम, रस- खान इत्यादि मुसलमान थोर पुरुषांचीं चरित्रे आणि त्यांचे ग्रंथ पाहिले, तर मुसलमान-समाजावर बहुसंख्य हिन्दूंच्या प्राचीन व उच्च तत्वज्ञानाचा परिणाम त्या वेळीं बराच झाला होता; असे म्हणण्याला हरकत नाही. एक कवि म्हणतो-

दीने मुहम्मदीका बेबाक बेडा
न जेजोंमें ठेहेरा न कुलजम में अटका ॥
किये जिसने तै चलके सातो समुन्दर ।
वह डूवा दहानेमें गंगा के आखिर ॥२॥

 ( भावार्थ- जो इस्लामधर्मरूपी नौका-समूह निर्भयपणें स्पेनपासून चीनपर्यंत वेगाने चालला होता, तो सरतेशेवटीं आर्यतत्वज्ञानाच्या प्रशांत गंगाप्रवाहांत विश्राम पावला ! )