पान:हिंन्दू सम्राट्.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६६)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

ओनामा एका खडी आधी मांडिती धडे
मग मोडिती पाढे अभ्यासिती ॥
तैसे तीर्थ प्रतिमा, ओनाम्याचे धडे ।
स्वहिता घडफुडे सेवा संत ॥ १ ॥

 अकबराच्या दरबारांतील 'रहीम' नामक मुसलमान कवि आमच्या संस्कृत भाषेत व पौराणिक उपमा- कल्पनांनी युक्त अशा कवितेमध्ये देवाला प्रश्न करितो--

रत्नाकरोस्ति सदनं गृहिणी च पद्मा |
किं देयमस्ति भवते जगदीश्वराय ? ॥

 (भावार्थ - रत्नाकर क्षीरसागर - हे ज्याचें निवासस्थान आहे आणि संपत्तीची देवता लक्ष्मी ही ज्याची स्त्री आहे, अशा-विष्णूला- जगदीशाला माझ्यासारख्या क्षुद्र माणसाने काय द्यावें ? अर्थात् अनन्य भक्ति ! दुसरें काय ? )

 तसेंच 'ताज बेगम ' ह्या नांवाची मुसलमान- स्त्री श्रीकृष्णचरित्रावर पुढीलप्रमाणे हृदयस्पर्शी कवनें करी-

श्यामला सलोना सिरताज सिर कुल्लेदार |
तेरे नेह दागमें निदाघ व्है दहूंगी मैं 11
नंद के कुमार कुरबान ताणी सूरत पै ।
ताण नाल प्यारे हिन्दुवानी है रहूंगी मैं ॥ १ ॥

 ( भावार्थ - मुकुटधारी श्यामसुंदर श्रीकृष्णाचे अहर्निश करण्यामध्ये माझें अन्तःकरण रंगून शुद्ध होईल. हे नंदकिशोर श्रीकृष्णा ! तुझ्या सौंदर्यावर माझे सर्वस्व ओवाळून टाकीन आणि ' हिन्दु' भक्त बनून तुझेंच भजनपूजन करीत राहीन.)

 महासाधु कबीर हा तर काशींतील रामानंद स्वामींचा शिष्यच होता.