पान:हिंन्दू सम्राट्.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिन्दुस्थानचे हिंदु सम्राट्

(६३)

(११) धार्मिक आंदोलन.

 कोणत्याही देशाचा खरा इतिहास म्हणजे केवळ ' हाणामारीचा सविस्तर 'नव्हे; कारण त्या देशांतील लोकांच्या सामाजिक जीवनाचें ज्ञान नुसत्या युद्ध - वर्णनावरून व राजकीय घडामोडींवरून पूर्णपणे होत नाही. ही सामान्य गोष्ट आपल्या हिंदुस्थानच्या इतिहासाचे बाबतींतही लागू पडेल, श्रीयुत के. ए. वीर राघवाचारियर नामक एक इतिहासकार आपल्या हिस्टरी ऑफ इंडिया' ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेंत म्हणतात -

 "...I learned to repeat the मुसलमान kings and the dates of their reigus, bint knew nothing of the country under their rale. I learned the causes of the मराठा wars, and the results following them, but I did not understand मराठा race. .........I gained the prowess of the nothing from the study of history !"

 अर्थात् ' इतिहासाच्या अध्ययनापासून माझे पदरांत खरे पाहतां कांहीच पडले नाही!' हे एका ग्रंथकर्त्यांचे विद्यार्थीदशेंतील अनुभवाच्या स्मृतीचे उद्वार आमच्या इतिहासलेखनामधील अपूर्णता दर्शविण्याला पुरेसे आहेत.

 समाट् पृथ्वीराज चौहान ह्याचे पश्चात् राजकीय क्षेत्रांत हिंदूंच्या