पान:हिंन्दू सम्राट्.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६२)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

आपला एक मांडलिक ह्या नात्याने फक्त सांबर (अजमीर ) येथील राज्य ठोवले. पुढील इतिहासांत ह्या घराण्याचें विशेष नांव आढळत नाही.

 सम्राट् पृथ्वीराज ह्याचा जन्मकाळ, राज्यारोहण व अन्तकाल ह्यांच्या सन-संवतामध्ये अद्याप एकवाक्यता झालेली दिसत नाही. तरीपण सुमारें चाळीस वर्षांच्या वयांतच त्याचें जीवनचरित्र संपलें, असें म्हणतां येतें.. आणि तें आयुष्यदेखील अनेक युद्धांमध्ये प्रायः खर्च पडल्यामुळे राज्यां तील सुखशांति किंवा विद्येची प्रगति ह्या गोष्टींकडे त्याचे विशेष लक्ष्य गेल्याचें दिसत नाही, तरी तत्कालीन चारदोन गोष्टींवरून त्याच्या राजवटी- मधील वस्तुस्थितींवर थोडासा प्रकाश पडत आहे. अजमीर येथे त्याच्या पूर्वीपासून एक मोठी संस्कृत पाठशाळा चालू असे; परन्तु महंमद घोरीला ती न पाहवल्यामुळे तिची त्याने मशीद बनविली ! ती ' अढाई दिनकी झोपडी ' ह्या नांवाने हल्ली ओळखतात !

 पृथ्वीराजाचे दरबारी' चंद' नामक एक विख्यात कवि होता. त्या 'पृथ्वीराजरासो' ह्या नांवाचे महाकाव्य हिन्दी भाषेंत रचलें असून, पृथ्वीराज हा त्या काव्याचा नायक होय. हिन्दीमधील आदिकवीचा मान ह्याच कवीला आहे. तोमार राजांनी वसविलेल्या दिल्लीच्या बाहेर पृथ्वी- राजाने आणखी तटबंदी करून 'पृथ्वीपूर' नामक शहर वसविले. त्याचे कांही अवशेष 'नवी दिल्ली' शहराच्या नैर्ऋत्येला आढळतात. ज्या मनोन्या- ला 'कुतुबमीनार' म्हणून ओळखिले जातें, चौहानराजांचा आहे. बिसलदेव चौहान ह्याने कुतुबुद्दीनाचा नेसून आणि नंतर ते प्रचंड काम पृथ्वीराजाने पूर्ण केले. त्याच्या रचनेवरून व बांधण्याला प्रारंभ केला आसपासच्या खाणाखुणांवरून तो विसलदेवाने गिजनीच्या तुर्कघराण्यां तील राजांवर मिळवलेल्या विजयाचें स्मारक असावें, किंवा पृथ्वीराजाने दुसऱ्या कांही उद्देशाने हिन्दु कारागिरीचा नमुना जगापुढे ठेविला असावा आणि कुतुबुद्दिनाने दिल्ली घेतल्यावर त्याला मुसलमानी वळण दिले असावें,असे कित्येक विद्वान् संशोधकांचे मत आहे.