पान:हिंन्दू सम्राट्.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सम्राट् पृथ्र्वाराज चौहान.

(५९)

आपल्या अजमीरचया राज्याला जोडलें होतें. अर्थात् * पृथ्वीराज × १ हा त्यानंतर ' बापाचे पश्चातू दिल्ली आणि अजमीर अशा संयुक्त राज्याचा मालक झाला. बिसलदेवापासून ‘ सम्राट् पदा ”च्या मानासाठी कनोज प्रभृति राज्यांमध्यें स्पर्धा असे. पृथ्वीराज गादीवर बसल्यानंतर कनोजचा जयचन्द्र राठोड व गुजराथचा भीमदेव हे त्याजबरोबर वरीलप्रमाणे मानासाठी झगडत होते. त्याशिवाय ', पृथ्वीराज ” ह्याचा पिता ' सोमराज ” ह्याला भीमदेवाने मारलें असल्यामुळेही भीमदेवावर त्याचा राग असणें साहजिक होतें. लौकरच त्याचा सूड घेण्याची एक संधि पृथ्वीराजाला मिळाली. अबूच्या * इच्छिनीकुमारी ? नामक एका राजकन्येशीं सत्तेच्या जोरावर ' भीमदेव ? विवाह करूं इच्छीत होता; पण अबूच्या राजाने तें नाकबूल करून भीमदेवाविरुद्ध पृथ्वीराजाची मदत मागितली. पृथ्वीराजाने त्याच्या विनंतीचा आनंदाने स्वीकार करून भीमदेवावर स्वारी केली. तेव्हा पृथ्वीराजाला प्रथम 'विजयश्री'ने व नंतर * इच्छिनीकुमारी ' ने माळ घातली ! (लोकहितवादीकृत गुजराथचा इतिहास. )

 ह्या गोष्टीनंतर बुंदेलखंडांतील महोवाचा राजा परमर्दिदेव ह्याजवर पृथ्वीराजाने स्वारी केली. त्यामध्येही त्याला विजय मिळाला; परन्तु ह्या युद्धांत उभयपक्षीं हजारो वीरांचा संहार झाला. हिंदुस्थान देशावर मुसलमान राजे चढाई करूं पहात असतां, तिकडे रजपूत राजांनी दुर्लक्ष्य करून असल्या भयंकर युद्धांमधून आपल्या राष्ट्रीय सामथ्याची जी हानि केली, तिजबद्दल खेद वाटल्यावाचून रहात नाही ! रजपूत कन्यांचें स्वयंवर


× पृथ्वीराज चौहानाचा जन्म आनंद संवत् १११५ ( ११४९ इ० ) मध्ये झाला, असें 'चंद? म्हणतो; पण टॅीडच्या मतें ११५८ इ० सन असावा.