पान:हिंन्दू सम्राट्.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५८)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राष्ट्र.

हिन्दुस्थानचे हिंदु सम्राष्ट्र.

(१०) सम्राटू पॄथ्वीराज चौहान

  मालखेडच्या राष्ट्रकूटांचें साम्राज्य लय पावल्यानंतर पुढील एकदोन शतकांमध्ये ह्या देशांत अनेक लहान लहान हिंदुराज्यें चालत होती. अफगाणिस्थानांत चालू असलेलें हिंदु राज्य नष्ट होऊन, तेथे ह्याच सुमारास एक मुसलमान-तुर्क-घराणें राज्य करूं लागलें. स्या वंशांतील प्रसिद्ध 'महमूद' नामक सुलतानाने हिंदुस्थानावर अनेक स्वाञ्या केल्या. पंजाबच्या अनंगपालाने अनेक रजपूत राजांच्या सहाय्याने त्याला प्रतिकार केला; परन्तु कांहीं प्रासंगिक कारणामुळे त्याचा पराभव होऊन पंजाबांत मुसलमानी सत्ता स्थापन झाली. महमुदानंतर त्याचा मुलगा ' मसाऊद' ह्याने सतलज नदी उतरून ' हान्सी ' नामक किल्ला घेतला आणि आग्नेय बाजूला बनारसपर्यात स्वाच्या केल्या. कांही काळ लोटल्यावर दिल्लीच्या ' तोमार ? राजांनी मुसलमानांकडून तो हान्सी किल्ला व भोवतालचा मुलुख परत सोडवून घेतला. नंतर सांबर (अजमीर ) च्या 'बिसलेदव चैौहान ? ह्या विख्यात राजानेही मुसलमानांस हटवीत नेऊन । सतलज ? नदीच्या अलीकडील सर्व प्रदेशावर पुनः हिंदूंची सत्ता स्थापिली. ह्या चौहान घराण्यांत 'पृथ्वीराज' हा सर्वात जास्त प्राद्ध आहे.आजकालही चितोडच्या अनेक राजांप्रमाणे ' पृथ्वीराजा' ची कीर्ति राजस्थानांत विशेष ऐकू येते व रजपुतांना त्याच्याबद्दल विलक्षण ओादर व अभिमान वाटतो.

 दिल्लीचें तोमारांचें राज्य बिसलदेव चैौहानाने इ० सन ११५२ त