पान:हिंन्दू सम्राट्.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६०)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

आणि राजेलोकांची सम्राटपदासाठी स्पर्धा ह्या गोष्टी एका काळीं उपयुक्त असल्या तरी परकी आक्रमणाच्या वेळी त्या हानिकारकच ठरतात ! कनोज- च्या संयोगितेचें स्वयंवर होऊन तिच्याशीं पृथ्वीराजाचा विवाह झाला; परन्तु त्यामुळे दिल्ली व कनोज ह्यांमध्ये वैर माजले आणि तेंच दोन्ही राज्यांच्या व पर्यायाने साज्या राष्ट्राच्या पारतंत्र्याला कारण झाले, असे म्हणण्याला हरकत नाही.

 अनेक युद्धांत पराक्रम गाजवून पृथ्वीराजाने आपणांस 'सम्राट्' पद प्राप्त करून घेतले व त्यानंतर कांही काळ त्याने दिल्ली शहरांत मोठ्या ऐष- आरामांत घालविला. पुढे १९९१ इ० मध्ये अफगाणिस्थानच्या महंमद घोरीने हिंदुस्थानवर स्वारी करून पृथ्वीराजाचीं कांही ठाणीं घेतली. त्यामुळे पृथ्वीराजही मोठ्या सैन्यानिशीं त्याच्यावर चालून गेला. स्थानेश्वराजवळ तुमुल युद्ध झालें. पृथ्वीराजाने महंमद घोरीला पकडलें, हैं समजतांच पठाण लोकांनी पळ काढला आणि सम्राट् पृथ्वीराज ह्याला जय मिळाला. घोरीने शरण जाऊन याचना केल्यामुळे उदार मनाने त्याला पृथ्वीराजाने सुखरूप परत जाऊं दिलें. ह्यावरून अजूनही रजपुतांचें शौर्य मुसलमान लोकांइतकें किंबहुना अधिक होतें, हें सिद्ध होतें.

 इ० स० १५९२ मध्ये महंमद घोरी मागील अपयश धुऊन काढण्यासाठी पृथ्वीराजावर पुनः चालून आला. आपलें औदार्य म्हणजे अपात्री दान झालें, हे आता पृथ्वीराजाला कळून आलें ! परन्तु युद्ध करण्याशिवाय आता गत्यंतर नव्हते. ह्या वेळीं पृथ्वीराजाच्या कांही वैयक्तिक चुकांमुळे बऱ्याच रजपुतांची नाराजी झाली होती. तरीदेखील पृथ्वीराजाच्या शौर्य- तेजा- त्यांना अत्यंत आदर वाटत असल्यामुळे व रजपूत लोक जात्या युद्धोत्सुक असल्यामुळे त्यांनी त्याला चांगले सहाय्य केलें. ह्या लढाईत आपला कोणी ना कोणी पूर्वज गेला होता, असें आमचे रजपूत संस्थानिक मोठ्या अभिमानाने सांगतात ! पृथ्वीराजाने पराक्रमाची शर्थ केली; परन्तु