पान:हिंन्दू सम्राट्.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सम्राद तिसरा गोविंदराज.

(५७)


तिसरा गोविंदराज ह्याने श्रीभवन ऊर्फ मालखेड हें सुन्दर नगर वसवून, ती साम्राज्याची राजधानी केली. देवस्थानांसाठी आणि विद्वानू ब्राह्मणांस दक्षिणा देण्यासाठी बरीच रोकड खांचीं पडत असे. विद्याथ्र्यांना दक्षिणा मोफत भिळे; इतकेंच नव्हे तर सरकारी इनाम जमिनीच्या उत्पन्नांतून व श्रीर्मत लोकांच्या देणग्यांतून कित्येक विद्याथ्र्यास जेवण व कपडेही मिळत.

 राष्ट्रकूटांच्या राज्यव्यवस्थेवरून तत्कालीन हिंदूंच्या राजकीय कल्पना आज आपणांस कळून येतील. त्यांच्या राज्यांतील सर्व गावांमधील सज्ञान व संभावित अशा लोकांना आपापल्या गावच्या पाटील-कुलकण्यांच्या कामावर नजर ठेवून सार्वजनिक कामांमध्ये लक्ष्य घालतां येत असे. अशा प्रमुखांना 'महाजन ' किंवा 'ग्राममहत्तर' असें म्हणत. जिल्हे आणि प्रांत ह्यांमधील मुख्य शहरांत 'विषयमहत्तर? नांवाच्या लोकसभा असत. त्या लोकांचें म्हणणें सरकारपुढे मांडीत असत. स्वतः ' सम्राट्या' हे धर्मशास्त्राचे नियम, रूढीने चालू असलेले लोकांचे हक आणि मंत्रिमंडळाचा सलुा ह्या सर्वांच्या अनुरोधाने कामकाज करीत असत. त्यांतूनही जर’ एखादा सम्राट् मनसोक्त वागू लागला, तर त्याला मांडलिक राजे व प्रजा ह्यांच्या रोषाला बळी पडून (चौथ्या गोविंदराजाप्रमाणे) राज्यभ्रष्ट व्हावें लागे ! ह्यावरून राष्ट्रकूट राजे अनियंत्रित अरेराव नव्हते आणि त्यांची हिंदु प्रजादेखील कितीही राजनिष्ठ असली, तरी 'मुकीं बिचारी कुणी हांका ? अशा मेषवृत्तीची नव्हती, हें सिद्ध होतें. चंद्रगुस मोर्यापासून आतापर्यंतच्या अनेक राजांच्या चरित्रांवरून हीच गोष्ट कोणाच्याही निदर्शनास : येऊं शकेल.

 सम्राट् तिसरा गोविंदराज इ०स० ८१४ मध्ये मरण पावला. त्याचे पश्चातू त्याचा पुत्र ' अमोघवर्ष ? हा गादीवर बसला. अरब प्रवासी सुलेमान ह्याने त्याची गणना जगांतील चार मोठ्या बादशहांमध्ये केली आहे !