पान:हिंन्दू सम्राट्.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५६)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

स्वतंत्र आणि संपन्न होता, असे दिसून येईल. इतकेंच नव्हे तर भारता- बाहेरही हिंदु संस्कृति व हिंदुराज्यें नांदत होतीं ! अफगाणिस्थानांत हिंदु- राजघराणे चालले होते. पूर्वेकडील द्वीपांमध्ये आंध्र, तामीळ वगैरे प्रांतां- तील हिंदूंचीं राज्ये दहा-अकराव्या शतकापर्यंत नांदत होतीं हैं वर्णन मागे. आलेच आहे. व्यापार व विद्या ह्यांचीही भरभराट होती. हरून- अल्- रशीदसारखे मुसलमानी खलीफा बगदाद येथे आपल्या दवाखान्यांवर हिंदु वैद्यांना मुख्य अधिकारी नेमीत. चरक आणि सुश्रुत ह्यांच्या आर्यवैद्यक ग्रंथांचीं भाषांतरें अरबी भाषेमध्ये दोघां ब्राह्मणांनी केलीं होतीं. दहाव्या शतकांत हिंदुस्थानांत आलेला 'अल्बिरुगी' नामक एक मुसलमान प्रवासी म्हणतो- 'मी अनेक भाषांतील आणि अनेक लोकांमधील अंकांची माहिती घेतली; परन्तु कोठेही हजारांच्या पुढे संख्येचें नांव मिळाले नाही. हिंदुलोक अठरा स्थानांपर्यन्त (पराधीपर्यंत ) संख्या मांडूं शकतात, " हिंदूंची संख्यालेखन 'दशमान' पद्धति प्रथम अरब लोक शिकले आणि त्यांचेपासून ती युरोपियन लोकांना समजली. अरबी भाषेमध्ये ' अंक ' ह्या अर्थी 'हिंदसा' शब्द आहे. त्यावरून वरील इति- हासाला पुष्टि मिळते.

 हिंदुस्थानांतील मलमल आणि इतर कारागिरीचे पदार्थ ह्यांना बग- दादच्या दरबारांत फार महत्त्व मिळे. युरोपांतही शार्लमेनसारखे मोठमोठे राजे भारतीय कौशल्याचें कौतुक करीत.

 राष्ट्रकूट राजे सरकारी खजिन्यांतून तळीं, कालवे आणि मंदिरें बांधण्या- साठी पुष्कळ खर्च करीत. वेरूळ एथील खडक खोदून बनविलेले शिवा- लय ( कैलास लेणें ) भव्य व सुन्दर असून, जगांतील अत्यन्त प्रसिद्ध अशा शिल्पकृतींपैकी एक असें मानितात ! तें कृष्णराज 'राष्ट्रकुटाने बांधिलें. वेरूळच्या लेण्यांनी राष्ट्रकूटांचे नांव अजरामर केलं आहे. सम्राट्