पान:हिंन्दू सम्राट्.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सम्राट द्विखरा गोविंदराज.

(५५)


मुळे हळूहळू त्याची सत्ता ' नागभट्ट ? ह्याने संपुष्टांत आणली होती; म्हणून सम्राट गोविंदराजाने प्रथम नागभट्टाचाच पराभव केला. हें समजतांच चक्रायुधानेही गोविंदराजाचें आधिराज्य मान्य केलें. पुढे त्याने बंगालकडे चाल केली. तेव्हा तेथील राजा ' धर्मपाल' हाही त्याला शरण गेला. राष्ट्रकूट-सैन्याच्या गडबडीने हिमालयांतील गुहा दणाणून गेल्या, असें त्या स्वारीचें वर्णन ताम्रपटांमधून आढळतें. ह्या एवढ्या स्वारींत फक्त * माळवा प्रांत ? राष्ट्रकूट साम्राज्यांत समाविष्ट [खालसा ] झाला आणि इतर राजांकडून गोविंदराजाने फक्त खंडणी गोळा केली.

 राष्ट्रकूटांच्या ह्या उत्कर्षांबद्दल कांचीचे पल्लव, मदुरैचे पांड्य व मलबारमधील केरळ इत्यादि अनेक लहानमोठ्या राजांना वैषम्य वाटून गोविंदराज दूर गेला आहे, असें पाहून त्याचें वर्चस्व झुगारून देण्याची खटपट त्यांनी चालविली. ही बातमी समजतांच सम्राट गोविंदराज हा विजेच्या वेगाने गुजराथेंतून म्हैसूरपर्यंत चालून आला आणि त्या सर्वांचा त्याने खरपूस समाचार घेतला, हें ऐकून सिलोनच्या राजानेही त्याचें मांडलिकत्व मान्य केलें.

 इ० स० ८१२ सुमारास राष्ट्रकूटांचा दरारा हिमालयापासून सिलोनपर्यंत आणि भडोचपासून बंगालपर्यंत चांगलाच बसला होता. श्रीकृष्णजन्मानंतर त्याच्या प्रभावाने जसा यदुवंश आजंक्य झाला, तसा गोविंदराज गादीवर बसल्यानंतर 'राष्ट्रकूट” वंश आजंक्य झाला, असें एका ताम्रपटांत म्हटलें आहे.

 'राष्ट्रकूट' व-हाडमध्ये असतां 'इन्द्रराज ” नामक एका राष्ट्रकूट राजाने गुजराथेंतील चालुक्यांना साह्य करून इ० स० ७३५ मध्ये सिंधकडून झालेली अरबांची स्वारी परतविली. त्यानंतर त्यांनी प्रायः अरबांना जोराचा विरोध केला नाही आणि त्यांच्या दरा-यामुळे अरबांनी हि व्यापार करण्यापलीकडे राजकीय किंवा धार्मिक आक्रमण करण्याचें पुनः धाडस केलें नाही.

 हें राष्ट्रकूट घराणें इ० स० ७५० पासून ९७७ पर्यंत राज्य करीत होतें. ह्या दोनशे वर्षांमध्ये सिंधमधील थोडासा प्रदेश वगळला, तर सर्व हिंदुस्थान