पान:हिंन्दू सम्राट्.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५४)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

 राष्ट्रकूट राजवंशांतील तेरावा पुरुष 'ध्रुवराज' ह्याने आपला तिसरा मुलगा ' गोविंदराज ' हा सर्व मुलांमध्ये योग्य समजून, त्याला आपल्या इयातींतच युवराजपद दिलें; त्यामुळे बापाचे पश्चात् तो गादीवर बसला. तरीदेखील त्याचा थोरला भाऊ ' स्तंभरणावलोक' ह्याला आपला हक्क बुडाल्यामुळे दुःख वाटत होतेंच, थोड्या दिवसांनी त्याने इतर राजांचें सा घेऊन गादी मिळविण्याचा यत्न केला. गोविंदराजानेही पूर्ण सिद्धता करून, त्याचेबरोबर युद्ध केलें. तेव्हा ' स्तंभराज ' त्याचे हातीं सापडला; परन्तु त्याला उदार मनाने क्षमा करून म्हैसूरजवळ 'गंगवाडी' येथे आपला सुभेदार नेमिलें. तेव्हापासून दोघे भाऊ प्रेमाने वागू लागले. कोठे गोविंद- राज आणि कोठे बंधुघातकी औरंगजेब !

 ह्यानंतर भावांच्या यादवीचा फायदा घेऊन स्वार्थ साधूं पाहणाऱ्या राजांचा बंदोबस्त करण्यासाठी गोविंदराज बाहेर पडला.

 प्रथमतः बापाने कैदेत ठेवलेल्या गंगवाडीच्या ज्या राजाला दया दाखवून स्वतः गोविंदराजाने मुक्त केले होते आणि जो पुनः शिवमार 'विरुद्ध जाऊन स्तंभराजाला साह्य करीत होता, त्याला पुनः कैद केलें. नंतर कांचांच्या पल्लवांचा दोन वेळा पराभव केला. तसेच वेंगीच्या 'विक्रमादित्य ' चालुक्यांचा मोड करून त्यांच्या राजाला पकडून आणून आपल्या घोड्यांचे तबले झाडण्याला लाविलें ! अशा कडक उपायांनी आपल्या मांडलिकांवर आणि शत्रूवर दहशत बसविली. पुढे त्या चालुक्य विजयादित्य राजाकडून कांही खंडणी घेऊन त्याला सोडून दिलें.

 दक्षिण हिंदुस्थानांतील आपली साम्राज्यसत्ता अशा प्रकारें दृढ केल्यानंतर तो बापाप्रमाणे उत्तर-दिग्विजयासाठी निघाला. त्या वेळीं कनोज येथे 'चक्रायुध, ' बंगालमध्ये 'धर्मपाल' आणि राजस्थानांन ' नागभट्ट ' असे तीन राजे उत्तरहिंदुस्थानांत प्रमुख गणले जात. चक्रायुध दुर्बल असल्या-