पान:हिंन्दू सम्राट्.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्

(५३)

( १ ) सम्राट् तिसरा गोविंदराज

( राष्ट्रकूट )

( इ० स० ७९३ ते ८१४ )

 सम्राट् हर्षवर्धनानंतर कनोज येथे लागोपाठ ' वर्म' (राज्यश्रीचे घराणे), बंगालचे पाल आणि मारवाड किंवा लाट नामक प्रदेशांतील 'प्रतिहार ' अशा निरनिराळ्या वंशांतील राजांकडे राजसत्ता चालली होती. स्वतःच्या प्रांतांत राज्य करून कनोज येथील सत्ताही आपल्या हातीं ठेवू पाहणाऱ्या पाल-प्रतिहारांचा आणि मूळच्या ' वर्म' कुळांतील राजांना जिंकून दक्षिण- तील 'राष्ट्रकूट' सम्राटांनी सर्वत्र आपलें अधिराज्य स्थापन केलें. उत्तर हिंदच्या दिग्विजयाचे बाबतींत राष्ट्रकूटांनी आंध्र राजांची जणू पुनरावृत्तीच केली !

 राष्ट्रकूट हे प्रथमतः मुलकी प्रांताधिकारी व नंतर (दक्षिण गुजराथेंतील चालुक्य साम्राज्याचे ) मांडलिक ह्या नात्याने वन्हाड प्रांतांत होते. नंतर इ०स० ७५० च्या सुमारास चालुक्य राजे दुर्बल झाले असतां ते स्वतंत्र राजे झाले. आणखी कांही काळाने ते महाराष्ट्रांत आले व त्यांनी चालुक्यांचें राज्य जिंकलें.


  • प्रस्तुत पुस्तकांतील बहुतेक सम्राटांच्या कारकिदीं त्यांच्या राज्या-

रोहणापासून मृत्यु होईपर्यंत दिल्या आहेत, हे वाचकांच्या ध्यानांत येईलच.