पान:हिंन्दू सम्राट्.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५२)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्ः

विणारें राणा राजसिंहाचें शौर्य तर प्रसिद्धच आहे ! त्याचप्रमाणे त्याने बांधलेला 'राजसमुद्र” आणि त्याचे मुलाने बांधिलेला ‘जयसमुद्र' इत्यादि उपयुक्त गोष्टींवरून ह्या राजघराण्याची प्रजेविषयी कळकळदेखील व्यक्त होत आहे. सती पाझेनी व साध्वी मीराबाई अशा अनेक थोर ख्रियांनी मेवाडच्या यशाला आधिक उज्ज्वलता आणली आहे. तसेंच चूडाजी व भीमसिंह इत्यादि रजपुत्रांनी प्रसगीं राज्याचा आपला हक सोडून स्वार्थत्यागाची पराकाष्ठा करून दाखविली आहे. छत्रपति शिवाजीमहाराज हेही ह्याच घराण्याच्या एका शाखेमध्ये जन्मले ! दुसरी एक शाखा नेपाळांत गेली, तिने स्थापलेलें 'स्वतंत्र हिंदुराज्य' आजही कोट्यवधि हिंदुजनांच्या अभिमानाचें आणि स्फूर्तीचें स्थान मानलें जात आहे.