पान:हिंन्दू सम्राट्.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदुस्थानाचे हिंदु सम्राट

(४७)

(८) चक्राक्र्ती क्प्फा राक्ळ
(जन्म, इ० ७००, संन्यास इ० ७६३)

 मागील प्रकरणांत वर्णिल्याप्रमाणे बौद्ध धर्माला ओहोटी लागून आमच्या 'वैदिक' धर्माची घडी बसू लागणार, तोंच ह्या दशावर सेंधकडून अरबांच्या राजकीय व धार्मिक आक्रमणाचें नवेंच संकट येऊन ठेपलें ! शूर दाहीर राजाने अरबांना जोराचा प्रतिकार केला; परन्तु बौद्धांच्या अहिंसेच्या अनुचित कल्पनेमुळे, स्थानिक हिंदु राजांच्या विस्कळितपणामुळे आणि 'मोका बसय्या' सारख्या नीच माणसाच्या फितुरीमुळे 'दाहीर? राजाचा सर्वनाश झाला! ह्या यशाने फुरफुरलेले अरब मोठ्या आवेशाने पुढे राजस्थानांत घुसले ! मात्र हिंदूंच्या सुदैवाने तेथे त्यांची डाळ शिजली नाही. चितोडच्या 'बाप्पा रावळ' नामक हिंदु वीराने त्यांना चांगलाच मार दिला. म्हणून त्याला कोणी 'चार्लस् मार्टेलू' * याची उपमा देतात. उदेपूरच्या तेजस्वी राजघराण्याचा 'बाप्पा रावळ' हा मूळ पुरुष होय.

चक्रवतीं बाप्पा रावळ ह्याच्याविषयी विश्वसनीय ऐतिहासिक माहिती: फार थोडी मिळते. तरी दंतकथांवरून आणि त्याच्या सापडलेल्या सुवर्णमुद्रा इत्यादिकां वरून तो महाप्रतापी असून, ब-याच 'मोठ्या राज्याचा


  • ‘चार्लस् मार्टेलू' हा फ्रेंच सरदार होता. त्याने आठव्या शतकांत स्पेनकडून फ्रान्सच्या हद्दीवर होणारे 'मूर-अरब' लोकांचे हले मोठ्या शौर्याने परतवून स्वदेशाचें रक्षण केलें.