पान:हिंन्दू सम्राट्.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४६)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्


प्रख्यात असून, त्याला 'शांकरभाष्य' म्हणतात. वेदांविषयी पूज्यभाव वाढवून आणि तत्त्वज्ञानामध्ये 'अद्वैत' अर्थात् चराचर सर्व सृष्टीमध्ये एकच व्यापक तत्व आहे, अशा मताचे प्रतिपादन करून त्यांनी बौद्धमताचा पाडाव केला. इतिहासांत त्यांच्या योग्यतेचा बुद्धिमान् वादविवादकुशल आणि विलक्षण धडाडीचा तत्त्वज्ञानी पुरुष क्वचितच सापडेल !

 आपलें कार्य अखंड चालू रहार्वे, म्हणून चारी दिशांना ( शृंगेरी, बदरी- केदार, द्वारका व जगन्नाथपुरी ) त्यांनी आपले मठ स्थापन केले. ते अद्याप चालू असून, त्यांचे द्वारा धार्मिक व सामाजिक अशा अनेक प्रश्नांचा निर्णय होत असतो. पीठस्थ आचार्य चांगले विद्वान् व योग्य पुरुष नेमले जातात. आद्य शंकराचार्यांप्रमाणे पुढीलही कित्येक आचार्यांनी धर्मग्रंथांवर 'भाष्ये' लिहिली आहेत. विजयनगरच्या हिंदु साम्राज्याला शृंगेरीच्या गुरूंचा मोठी आधार होता. त्यांच्या विरुदावलीमध्ये 'कर्नाटक-सिंहासन-प्रतिष्ठा पनाचार्य' असे शब्द आढळतात. त्यावरून वररील विधानाची सत्यता पटेल.

 ह्याच सुमारस सिंधप्रांतामध्ये मुसलमानांनी प्रवेश केला होता; पण शंकराचार्यापुढे बौद्धमताचा प्रश्न हाच फार व्यापक व महत्त्वाचा असल्यामुळे आणि ते स्वतः अल्पायुषी झाल्यामुळे मुसलमानी संकटाकडे त्यांचें लक्ष्य गेलें नसावे. खेरीज इस्लामी आक्रमण हे एका बैठकीवर बसून, पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष करून सामोपचाराने परतणे शक्य नव्हते. त्या कार्मी कणखर रजपुतांच्या प्रखर क्षात्र तेजाचीच जरूर होती ! (तें वर्णन पुढे येतच आहे. ) असो. इ० स० ८२० सालीं श्रीमत् शंकराचार्य निजधामास गेले.