पान:हिंन्दू सम्राट्.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैदिक धर्माचा पुनरुत्कर्ष.

(४५)

 शंकराचार्य हे मलबार प्रांतांतील 'कालटी' गावीं इ० स० ७८८ सालीं एक नंबुद्धी ब्राह्मणकुळांत जन्मले. त्यांच्या बापाचें नांव शिवगुरु व आईचें नांव आर्याम्बा असे होतें. शिवगुरु विद्वान् असून त्यांना 'कालटी' गाव अग्रहार म्हणजे इनाम होता. शिवगुरु शंकराचार्य लहान असतांनाच मरण पावले. तेव्हा मातुश्री आर्याम्बा हिने पांचव्या वर्षी 'शंकरा'चें उपनयन केलें. लोकोत्तर बुद्धिवान् असल्यामुळे आठव्या वर्षी पूर्ण वेदाध्ययन आणि • बाराव्या वर्षी शास्त्राध्ययन करून शंकर मोठा पंडित झाला ! अगदी लहान वयांतच ब्रह्मचर्याश्रमांतून त्याने एकदम संन्यास घेतला ! गोविंदयति हे त्यांचे आश्रमगुरु होते. ह्यानन्तर शंकराचार्यांनी देशभर संचार करून 'मंडनमिश्र' प्रभृति अनेक पंडितांशीं धार्मिक व तत्त्वज्ञानविषयक विवाद केले. त्यांच्या 'अद्वैत' मतापुढे पूर्वीचे अनेक वाद पोकळ ठरले. बौद्धांचा 'नास्तिपक्ष' किंवा जैनांचा 'स्याद्वाद' हे सारे 'अहं ब्रह्मास्मि' हा साक्षात्कार झाल्यानन्तर पोरकट वाटणें साहजिकच आहे. म्हणून शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांच्या विरुदावलीमध्ये-

गुरुपरंपराप्राप्तषड्दर्शनस्थापनाचार्य ... वैदिकमार्गप्रवर्तक-
सकलनास्तिक मतोच्छेदपूर्वकसकलधर्मसंस्थापनैकधुरीण

 इत्यादि गौरवाचे शब्द गाजत आहेत. स्वधर्मावर कालांतराने आलेली मलीनता दूर करण्यासाठी किंवा परधर्मीयांकडून सामान्य जनांचा 'होणारा बुद्धिभेद दूर करण्यासाठी स्वधर्माच्या पूज्य धर्मग्रन्थांचें लोकांना यथार्थ ज्ञान करून देणें हें तत्त्ववेच्यांचं आणि खन्या सुधारकांचे कर्तव्य असते. युरोपांत मार्टिन ल्यूथर ह्या पंडिताने 'बायबल' वर श्रद्धा ठेवून त्याचें ज्ञान लोकांना करून दिले; त्यामुळे लोकांना स्वधर्म आणि कर्तव्य समजून धर्माधिकाऱ्यांच्या अयोग्य प्रकारांना आळा बसला. आमच्या शंकराचार्यांनी त्याच उद्देशाने अनेक ग्रंथ लिहिले. गीता, उपनिषदें आणि वेदांतसूत्रे ह्या पवित्र ग्रंथांवर भाष्य ( स्पष्टीकरण ) लिहिलें तें विशेष