पान:हिंन्दू सम्राट्.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४०)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्ः

 हर्ष ह्याने पांचसहा वर्षे उद्योग करून नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेशामध्ये आपला अंमल बसविला. त्यानंतर 'समुद्रगुस' राजाप्रमाणे दक्षिणेकडे चढाई करण्याचाही त्याने प्रयत्न केला. परंतु त्या वेळीं दक्षिण हिंदुस्थानांत हर्षीप्रमाणेच बलाढ्य असा सम्राट् दुसरा पुलकेशी (चालुक्य) राज्य करीत होता. त्याचे दरबारीं इराणसारख्या दूर देशाचेही वकील नजराणे घेऊन येत असत.

 अशा प्रकारें हे दोन्ही सम्राट् तुल्यबल असल्यामुळे नर्मदा नदी दोघांची सीमा ठरून, दोन साम्राज्यें-उत्तर व दक्षिण अशा नैसर्मिक विभागांप्रमाणे -चालं. लागलीं. आपलें सार्वभौमत्व सिद्ध झाल्यानंतर इतर राजांचीं राज्यें कायम राखण्याची हिंदु सम्राटांची पद्धति हर्षवर्धनानेही चालविली होती, असें त्याच्या चरित्रावरून दिसून येतें. ह्या स्वारीनेतर हर्षाने बराच काळ राज्यव्यवस्था करण्यांत खर्च केला. ई० स० ६33 मध्ये हर्षाने वलभीचा राजा धुवसेन ह्यावर स्वारी केली. तेव्हा धव- सेनाने त्याचें सार्वभौमत्व पत्करिलें. नंतर सुराष्ट्र, कच्छ वगैरे प्रांतांचे राजेही त्याला शरण गेले. इ° स° ६४३ च्या सुमारास त्याने गंजम (ओरिसा) वर स्वारी केली. हॅच त्याचे कारकिर्दीमधील शेवटचें युद्ध होय. ह्यानंतर अशोकाप्रमाणे त्याने धार्मिक विषयाकडे जास्त लक्ष्य दिलें.

 सम्राट् हर्षवर्धन ह्याचे दरबारीं चीनचे वकील येत असत व तो आपले वकीलही तिकडे पाठवीत असे. समुद्रपर्यटन चालू असून जावासुमात्रा बेटांशी इकडील लोकांचें दळणवळण बरेंच असे. चिनी प्रवाशी ह्युएनत्संग हा बौद्ध ग्रंथ पाहण्यासाठी इ० स० ६७० च्या सुमारास हिंदुस्थानांत आला होता. तो कनोज येथे हर्षांकडे आणि दक्षिणेंतील बदामीचा सत्रूदू दुसरा पुलकेशी (चालुक्य) b त्याने लिहून ठवलेल्या हकिकतीवरून त्या काळचा इतिहास समजण्याला फार मदत होत आहे.