पान:हिंन्दू सम्राट्.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सम्राट् हर्षवर्धन

३९

 किंवा अर्वाचीन तानाजी-सूर्याजी मालुस-यांसारख्या अनेक प्रतापी वुइलय मांना जन्म देऊं शकते.

 लौकरच 'भंडी' नामक हर्षवर्धनाचा सरदार देवगुस राजाचें पारिपत्य करून आणि माळव्यांतून पुष्कळ द्रव्य घेऊन त्याचे शिबिरामध्ये येऊन पोहोचला. ‘राज्यश्री' ही देवगुसाच्या कैर्देतून पळून जाऊन विन्ध्याद्रीचे जंगलांत गेली असावी, असा शोधही त्याने राजाला सांगितला. तेव्हा गंगेच्या काठीं आपली सेना ठेवून स्वतः हर्ष राजा राज्यश्री चे शोधार्थ विंध्याद्वीवर गेला. तेथे एका वृद्ध भिक्षूच्या मदतीने त्याने राज्यश्रीचा बरोबर तपास लाविला, त्या वेळीं ती सती जाण्याच्या अगदी तयारींत होती. हर्षाने तिची कशीबशी समजूत घालून तिला त्या कृत्यापासून परावृत्त केलें आणि तिचेसह तो परत आपल्या तंबूत दाखल झाला. नन्तर राज्यश्रीला मूलबाळ नसल्यामुळे 'कनोज' येथील राज्यव्यवस्था कोणी कशी चालवावी, असा प्रश्न उत्पन्न झाला. कनोजच्या मंत्रिपरिषदेने हर्षवर्धनालाच राज्य करण्याविषयी विनंती केली. शेवटीं सर्वानुमतें 'बोधिसत्व अवलोकितेश्वर' ह्या देवाचा कौल घेऊन पुढील व्यवस्था करण्याचें ठरलें. देवानेही कौल दिला की, राज्यश्रीच्या नांवाने हर्षवर्धनाने कनोजचा राज्यकारभार पहावा. ह्या वेळेपासून राजा हर्षवर्धन कनोज येथे राहूं लागला. देवाच्या आज्ञेने व लोकांच्या संमतीने त्याने कनोजचे राज्य स्वीकारिलें. बहिणीच्याही अधिकाराची जाणीव त्याने आमरण ठेवली होती, ही विशेष गोष्ट होय.

 ह्यानन्तर बंगालचा राजा शशांक ह्याजवर हर्षाने शस्त्र धरिलें. तेव्हा शशांक राजाचा पराभव होऊन बंगालवर हषांचें अधिराज्य स्थापन झालें. शशांकापासून होणारा त्रास चुकविण्यासाठी पूर्वेकडील कामरूप (आसाम) व प्राग्ज्योतिषपूर येथील राजांनी हर्षवर्धनाचें अधिराज्य मान्य करून व त्याला मौल्यवान् भेटी देऊन, त्याचेशीं सख्य जोडलें. अशा प्रकारें सम्राट