पान:हिंन्दू सम्राट्.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३८)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्

 सम्राट् हर्षवर्धन हा इ० स० ६०६ मध्ये 'शिलादित्य' हैं नांव धारण करून पंजाबमधील वडिलार्जित राज्याचा राजा झाला. राज्यपद मिळाल्या नंतर बहींण 'राज्यश्री' हिची सुटका करण्याच्या खटपटीस लागणे, हें त्याचें कर्तव्यच होतें. त्याकरिता सैन्याची जमवाजमव करून युद्धाला निघण्यासाठी त्याने प्रस्थान ठेविलें. पश्चिमेकडून परकी हू लोकांच्या स्वाच्या त्याने प्रत्यक्षच पाहिल्या होत्या आणि पूर्वेकडील देशी राजांच्या कार स्थानांत त्याच्या भावाची व महुण्याची आहुति पडली होती! त्यामुळे ही अस्वस्थता दूर करण्यासाठी एका प्रबळ साम्राज्यसत्तेची स्थापना करणे त्याला आवश्यक वाटलें; ( कारण सहाव्या शतकाच्या प्रारंभापासून गुप्त- वंशाचें साम्राज्य मोडकळीस येऊन पुढील पन्नास वर्षांत नष्ट झालें होतें. ) म्हणून महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन आपले अधिराज्य स्वीकारण्याविषयी त्याने अनेक राजांना पत्रे पाठविलीं. तो दिग्विजयाला बाहेर पडल्यानन्तर त्याच्या पहिल्याच मुक्कामावर एक अद्भुतरम्य गोष्ट घडली ती अशी-

 तेथील एका प्रमुख ग्रामस्थाने (पाटलाने ) त्याला एक 'अंगठी' भेट दिली; पण ती घालीत असतां राजाचे हातून निसटून चुकून खालीं पडली; हे पाहून कांही सैनिक आपल्या भावी यशाविषयी साशंक झाले ! परंतु चाणाक्ष हर्षाने त्यांच्या मनांतील चलबिचल ओळखून म्हटले, ."सैनिकानों ! पहा, ह्या अंगठीचा जमिनीवर कसा ठसा उठला आहे तो ! ह्या ठशाप्रमाणे माझ्या साम्राज्यसत्तेची छाप सर्वत्र पडलेली तुम्ही लौकरच पहाल !” अर्थात् ह्या भाषणाने सैनिकांचा उत्साह द्विगुणित झाला, हे सांगावयास नकोच. ह्याला म्हणावें प्रसंगावधान ! अपशकुनाचा शुभ शकुन करून दाखवणारा इंग्लंडविजेता 'वुइल्यम् दि काँकरर ह्याची गोष्ट अशाच प्रकारची आहे. हिंदभूमीदेखील प्राचीन हर्षराजासारख्या


इंग्लिश किनाऱ्यावर पालथा पडलेला वुइल्यम् चिखलाने भरलेला हात दाखवीत म्हणतो-'हें पहा, इंग्लंड माझे हातीं आलें !"