पान:हिंन्दू सम्राट्.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सम्राट् हर्षवर्धन.

(३७)

कमी होऊन इकडे आलेले लोक नागरिक ह्या नात्याने शांततेने राहूं लागले. त्यांची स्वतःची अशी संस्कृति नव्हतीच. अर्थातच ते इकडील प्रचंड हिंदु- जन समुदायांतच मिळून गेले असावेत.

 एवढ्यावरून उघड होत आहे की, देशावरील संकट दूर करण्यासाठी संघटित होण्याची अक्कल हिंदू राजांनाहि देवाने दिली आहे. इतर समाजां- इतकाच हिंदु समाजहि स्वातंत्र्यप्रिय आहे आणि त्याने परकी आक्रमणांचा अनेक वेळा यशस्वी प्रतिकार करण्याचे सामर्थ्यहि प्रगट केलें आहे ! ग्रींक, शक आणि हूण लोकांच्या अनेक आक्रमणांतून हिंदुसमाज आणि संस्कृति टिकून राहिली आहे. एक हिंदी कवि म्हणतो-

यूनान मिश्र रोमाँ, सब मिट गये जहाँसे ।
अबतक मगर है बाकी, नामोनिशाँ हमारा ॥


 स्थानेश्वरचा राजा 'प्रभाकरवर्धन' हा इ० स० ६०५ च्या सुमारास मरण पावला. त्याची राणी 'यशोमती' हिला 'राज्यवर्धन' व 'हर्षवर्धन' असे दोन पुत्र असून 'राज्यश्री' नामक एक कन्या होती. राणी 'यशोमती' ही नवण्याबरोबर सती गेली. पुढे राज्यवर्धन गादीवर बसला. इतक्यांत राज्यश्री हिचा नवरा कनोजचा राजा 'गृहवर्मा' ह्याजवर माळव्याचा राजा 'देवगुप्त' ह्याने स्वारी करून त्याला ठार मारले आणि राज्यश्रींला कैदेत ठेवलें. तेव्हा बहिणीला सोडविण्यासाठी राज्यवर्धन ह्याने देवगुप्तावर स्वारी करून त्याचा पराभव केला; परन्तु देवगुप्ताचा मित्र बंगालचा राजा शशांकगुप्त ह्याने कांही कारस्थान करून राज्यवर्धनाला ठार मारिलें. त्या- मुळे अवध्या *सोळाव्या वर्षी हर्षवर्धन ह्याला स्थानेश्व स्थानेश्वर येथील राज्य- कारभाराची सूत्रे हातीं घ्यावी लागली.


  • प्रो० आपटे यांचे मतें हर्षाचा जन्मकाल विक्रम संवत् ६४७ ज्येष्ठ वद्य द्वादशी (इ० स० ५९०) हा होय. (भारत के प्राचीन राजवंश)