पान:हिंन्दू सम्राट्.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(३५)

हिन्दूच्या प्राचीन वसाहती.

झाला नव्हता, तेथे स्पेन व अमेरिका वगैरे ख्रिस्ती राष्ट्रांनी आपले वर्चस्व स्थापिलें. तरी देखील 'वाली' नामक एका बेटांत एक हिंदु राजा अद्याप राज्य करीत आहे !

 ह्या सर्व वसाहतींमधून हिंदु आणि बौद्ध लोक सुखाने रहात असत. पुढे हिंदुधर्मीयांना उतरती कळा लागली. तरीही अद्याप अनेक हिंदु मंदिरें व त्यांचे अवशेष दृष्टीला पडतात. कित्येक लोकांनी मुसलमानी धर्म स्वीकारला आहे, तरीसुद्धा हिंदूंचा आद्य काव्यग्रंथ 'रामायण' ते पूज्य मानिताव ! तिकडील कांही लोक अद्याप हनुमंताची पूजा करितात. बँकोक येथील एका बुद्ध मंदिराचे दरवाजावर चांदीमध्ये सुन्दर खोदकाम करून रामायणांतील अनेक देखाव्यांचें चित्रण केलें आहे. ह्या प्रदेशांतील सण, उत्सव, नाटकें व नृत्यकला ( वाली ) ह्यांमध्ये कोठेही पहा, हिंदु संस्कृतीचा उत्तम ठसा उमटलेला दिसतो.

 निरनिराळ्या द्वीपांतील हिंदुलोकांच्या वसाहतींच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाविषयी वर दिलेली ही माहिती म्हणजे 'दर्या में खसखस ' होय ! अशाच अनेक वसाहती आमच्या पूर्वजांनी पश्चिमेकडील कित्येक देशांतून केल्या होत्या, असें भाषा-साम्यावरून व प्राचीन अवशेषांवरून आजचे अनेक हिंदु विद्वान् सिद्ध करीत आहेत.