पान:हिंन्दू सम्राट्.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३४)
हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्.

इंद्रादित्य, धर्मराज अशीं हिंदु पद्धतीचीं आढळतात. सयाममध्ये पुष्कळ तामीळ लोकांनी वसाहत केली असून विद्यमान राजाचें नांव 'आनंद- महिदोल ' असें तामील रतिीचें आहे. कलिंग प्रांतांतील हिंदु जावा बेटांत गेले व त्यांनी तेथे वसाहती स्थापिल्या, ह्याचें द्योतक म्हणून ही मंडळी त्या वेळेपासून शतकाचा प्रारंभ धरितात. हा काल म्हणजे ख्रिस्तजन्मापूर्वी ७५ वर्षे होय. ह्या सान्या प्रदेशांत वाङ्मयांतून व लोकव्यवहारांतूनही रामकथेचा बराच प्रभाव दिसून येतो.

 शातवाहनांच्या अंमलाखाली पूर्वी असलेले पूर्व किनाऱ्यावरील तामीळ ( चोल ) लोक कापडाचा व्यापार करीत. त्यांचीं जहाजे ब्रह्मदेश व मलाया वगैरे प्रांतांत जात असत. पुढे दहाव्या शतकांत चोल राजे उदयास आले. चोल राजांमध्ये 'राजेंद्र चोल' नांवाचा राजा मोठा पराक्रमी होऊन गेला. त्याने आपलें आरमार पाठवून ब्रह्मी किनाऱ्यावरील आर्किपलागो आणि मलाया हे प्रदेश काबीज केले, पश्चिम किनान्यावरील लखदींव आणि मालदीव हीं बेटें ताब्यांत आणलीं व बंगालच्या उपसागरांतील निकोबार बेटाचाहि कबजा मिळविला. जावा बेटांतील 'शैलेंद्र' घराण्याचा राजा ‘ संग्रामविजयोत्तुंगवर्म' ह्याचा पराभव करून त्याजपासून राजेंद्र चोलाने सुमात्रा बेट जिंकून घेतलें. सुमात्रा बेटांतील 'श्रीविजय ' चें राज्य कांचीच्या पल्लवांचे वेळीं फार प्रसिद्ध होतें, फिलिपाईन्स व फोर्मोसा ह्यांमध्येही हिंदूंच्या वसाहती व लहान लहान राज्य स्थापन झालीं होतीं.

 अकराव्या शतकापासून ह्या प्रदेशांत कांही भागांतील मुसलमानांचें प्रथम राजकीय व नंतर धार्मिक वर्चस्व होत चाललें. हिंदुस्थानांत राहणाऱ्या हिंदूंना स्वदेशांतील तीव्र राजकीय व धार्मिक झगड्यांमुळे ह्या अनेक वसाहतींच्या शाखांकडे लक्ष देतां आलें नाही; त्यामुळे तिकडील हिंदु- सत्तेला उतरती कळा लागली आणि ज्या ठिकाणीं मुसलमानांचा प्रवेश