पान:हिंन्दू सम्राट्.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्


(५) हिन्दूंच्या फ्राचीन क्साहुती.


 हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये जे अनेक वर्णनीय व स्मरणीय विषय आहेत, त्यांपैकी 'बृहत् भारतामध्ये हिंदूंच्या प्राचीन वसाहती' हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजला पाहिजे. सध्या चाल असलेल्या इतिहासांत्तून ह्यासम्बन्धी फारसें कांही सापडत नाही, हें प्रचलित ऐतिहासिक वाङायाचें एक वैगुण्य होय. तरीपण अलीकडे ह्या गोष्टीकडे संशोधकांचें लक्ष जात आहे, हें सुचिन्ह आहे.

 आंध्र प्रांतांतील कांही हिंदु लोक ' सुमात्रा ' बेटांत गेल्याविषयी तिस-या प्रकरणांत आलेंच आहे. फाहियान आणि इांसगा + नांवाच्या दोघां चिनी प्रवाशांच्या लेखांवरून हिंदु लोकांच्या पूर्वेकडील वसाहतींची कांही माहिती मिळू शकते. जावा बेटांत ब्राह्मण धर्माचा विशेष प्रचार असल्याबद्दल फाहियान ह्याने लिहिलें आहे. तसेंच इहिंसग लिहितो-

 "इंडियन आर्किपेलागो (हिंदी द्वीपसमूह ) आणि त्याचे पूर्वेकडील प्रदेशांत हिंदूंच्या दहा वसाहती होत्या आणि तेथे धार्मिक आचार व चालीरीति हिंदूंच्याच पाळल्या जात असत".
सम्राट् अशोकाचे वेळीं बौद्ध भिक्षु ब्रह्मदेश, सयाम वैगरे प्रदेशांत गेलेच होते. पण त्यापूर्वी देखील म्हणजे गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वी हिंदु लोक सयामांत गेले होते. सयामचं राजे आपणांस रामचंद्राच्या वंशांतील समजतात व त्यांच्या राज्याभिषेकाच्या वळीं भारतीय विद्वान् ब्राह्मणांचा आशीर्वाद लागतो. तिकडील कांही गांवांचीं नांवें अयोध्या किंवा लवपूर आणि राजांचीं नांवेंह


  • इहिंसग हा चिनी प्रवासी सहाव्या शतकांत इकडे येऊन गेला.