पान:हिंन्दू सम्राट्.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४)


पुरुषांचे देता येईल. प्रस्तुतचे पुस्तक लिहीत असतां स्वकीय परकीय विषयक माझी दृष्टि अशा प्रकारची आहे.

 निरनिराळ्या कालखंडांतील, निरनिराळ्या प्रांतांतील आणि घराण्यांतील दहा प्रमुख सम्राटांची चरित्रे ही आपल्या इतिहासामधील मुख्य केंद्रे कल्पून देशांतील अनेक राजकीय घडामोडी, धार्मिक व साहित्यिक चळवळी आणि इतर कित्येक विषयांतील आमची प्रगति ह्यांचे दिग्दर्शन करण्याचा या पुस्तकांतील प्रयत्न वाचकांना रुचेल, अशी अपेक्षा आहे. आपल्या इतिहासाविषयी अद्याप पुष्कळ माहिती प्रकाशांत यावयाची आहे आणि कित्येक गोष्टींचा एकमताने निर्णयही व्हावयाचा आहे. विक्रम व शालिवाहन राजे आणि त्यांचा-शककत्यांचा काळ ह्याविषयी बराच मतभेद आहे ! दिल्लीचा 'कुतुबमिनार' पृथ्वीराज चव्हाणाचा 'यमुनास्तंभ' (कीर्तिस्तंभ ) ठरत आहे; तर दुसरीकडे कलकत्त्याची अंधारकोठडी ही कल्पित कथा मानली जाऊ लागली आहे ! अशा बिकट स्थितीतून मार्ग काढण्याला अस्सल ऐतिहासिक साधनांची अनुकूलता, विद्वत्ता, पर्यटन व आर्थिक सुस्थिति वगैरे कितीतरी गोष्टींची जरूर असते; परन्तु हें भाग्य साऱ्या लेखकांना कोठून मिळणार ? म्हणून यथामति केलेला हा प्रयत्न गोड करून घेण्याची वाचकांना नम्र विनंती करीत आहे.

 हिंदुस्थानचे हिंदु सम्राट हे पुस्तक लिहून झाल्यानंतर प्रकाशनाच्या खर्चाचा प्रश्न मला भेडसावू लागला; परन्तु औंध येथील श्री. पंडित श्री० दा० सातवळेकर (स्वाध्याय-मंडळ ) ह्यांनी उदार अन्तःकरणाने ती जबाबदारी मान्य केली, म्हणूनच माझें मनोराज्य सफल होऊ शकत आहे. ह्या त्यांच्या औदार्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. पुस्तक-प्रकाशनाच्या पूर्वी पुरुषार्थ मासिकांत ह्याचविषयी प्रसिद्ध झालेले माझे लेख नामांकित इतिहासलेखक प्राध्यापक ओतूरकर ह्यांजकडे अवलोकनार्थ पाठवून नंतर प्रस्तावना लिहून देण्याविषयी त्यांना विनंती केली आणि