पान:हिंन्दू सम्राट्.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सम्राट समुद्रगुप्त.

(३१)

होता, असें म्हणतो. त्यामुळे अशा गुणवान् राजाबद्दल अधिकाधिक आदर उत्पन्न होतो. गुप्त राजांच्या काळाला 'सुवर्णयुग' असें नांव देतां येईल. त्यांच्या राजवटींत पुराणे, स्मृति, ज्योतिष व नाटकें इत्यादि संस्कृत ग्रन्थ-- संपत्तीमध्ये सम्राटांच्या गुणग्राहकत्वामुळे महत्त्वाची भर पडली आहे.

 उमरावती येथील संगमरवरी स्तूप, काशी (सारनाथ ) येथील स्तूप, दिल्लीचा लोहस्तंभ, धातूंचे पुतळे व मूर्ति इत्यादिकांवरून त्या वेळीं चित्रकला, शिल्पकला व ओतकाम ह्या विषयांतही हिंदु कारागिरी चांगल्या स्थितीला पोंचली होती, हे कोणालाही पटू शकेल. सिलोन, चीन, जावा, रोम वगैरे परदेशांमध्ये हिंदु व्यापारी व नाविक जात येत असत, त्यामुळे व्यापारधंद्यांची भरभराट होऊन चारी दिशांनी हिंदुस्थानांत संपत्तीचा ओघ येत असे. अशा प्रकारें स्वातंत्र्य आणि सुखसमृद्धि ह्यांचे साहचर्य गुप्तांचे राजवटींत हिंदुस्थानाला दीर्घकाल लाभलें होतें.

 अशा रीतीने पंचेचाळीस वर्षे राज्य करून हा चक्रवर्ति 'समुद्रगुप्त इ० स० ३८० मध्ये दिवंगत झाला. त्याचे पश्चात् त्याचा पुत्र दुसरा. चन्द्रगुप्त ( विक्रमादित्य ) साम्राज्य - सिंहासनाधीश झाला.

 वास्तविक हें चौधें प्रकरण येथेच पूर्ण झाले आहे. परन्तु समुद्रगुप्ताचा पुत्र दुसरा चंद्रगुप्त हाच शककर्ता ' विक्रमादित्य ' असे कित्येक विद्वानांचे मत असल्यामुळे त्याजबद्दल येथे थोडा उल्लेख केला पाहिजे.

 चन्द्रगुप्ताने शक क्षत्रपांना जिंकून शांतता स्थापन केली; गुजराथ व माळवा हे प्रदेश आपल्या राज्याला जोडले आणि गुजराथेंतील बंदरांच्या व्यापारवृद्धीकडे लक्ष दिलें. विक्रमादित्य हें नांव धारण करून उज्जयिनी येथे आपली राजधानी स्थापिली. ह्यावरून संवत् कर्ता राजा विक्रमादित्य असे वाटतें. परन्तु ह्या अनुमानावर हा आक्षेप आहे की, ह्या चन्द्रगुप्ताचे पूर्वी इ० स० ६८ च्या सुमारास हाल नामक आंध्र राजा