पान:हिंन्दू सम्राट्.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(३०)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्.

 झाली. (३) पुराण, इतिहास, आणि वक्तृत्व इत्यादिकांची वाढ झाली. (४) अनेक प्रकारचे व विविध व्यवसायांतील लोक एकत्र होण्यामुळे व्यवहारधर्म उत्पन्न झाला. (५) संघ व राष्ट्र-धर्म ह्या कल्पनांचा प्रादुर्भाव झाला. (६) व्यापारवृद्धि झाली. (७) नृत्य-गायनादि कलांना उत्तेजन मिळालें. असो.

 समुद्रगुप्साने केलेल्या यज्ञाच्या वेळीं ज्या सुवर्णमुद्रा दान केल्या होत्या, त्यांपैकी कांही सुवर्णमुद्रा संशोधनामध्ये हातीं आल्या आहेत. त्यांजवर अश्वमेधाचें होमकुंड आणि घोडा अशीं चित्रे दिसतात आणि पलीकडचे बाजूला 'परस भागवत सम्राट समुद्रगुप्त ' असे शब्द आढळतात. त्यावरून त्याची वैदिक धर्मावरील श्रद्धा व्यक्त होते. तरी देखील बौद्धांचा तिरस्कार न करितां त्यांना तो उदार आश्रय देत असे. मथुरेसारख्या हिंदूंच्या मोठ्या क्षेत्रांतून सुद्धा अनेक बौद्ध मठ असून त्यांमध्ये हजारो बौद्ध भिक्षु रहात असत.

 गुप्तवंशांतील सम्राटांचे बरेच शिलालेख व नाणींही सापडलीं आहेत. त्यांवरून त्यांच्या चरित्रांची व समाजस्थितीचीही माहिती मिळते. लेखांची भाषा ' संस्कृत ? आणि लिपि : ब्राह्मी ? आहे. कांही नाण्यांमध्ये परदेशी नाण्यांचेंही अनुकरण केलेलें आढळतें. एका गरुडध्वजांकित नाण्यावर ब्राह्मी लिपींत परन्तु चिनी पद्धतीप्रमाणे * समुद्रगुप्त ? हीं अक्षरं वरून खाली अशीं लिहिलेलीं आढळतात आणि इतर मजकूर सरळ ब्राह्मी: लिपींतच आहे.

 दुसऱ्या कांही 'वीणांकित' नाण्यांवर सम्राट् समुद्रगुस चांगला पोशाख करून एका सुंदर कोचावर बसला असून वीणा हातीं घेऊन संगीतोपासना करीत असल्याचें दर्शविलें आहे. ह्या नाण्यांवरून दिग्विजयाच्या शिलालेखांतील गाननिपुणतेच्या उछेखाला दुजोरा मिळत आहे. तसेंच हरिशर्मा नामक एक कविसुन्द्रा ' सत्राट् समुद्रगुप्त " हा काप्यमर्मज्ञ व रसिक