पान:हिंन्दू सम्राट्.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सम्राट् समुद्रगुप्त.

(२९)

सम्राट् समुद्रगुप्ताची तडफ व पराक्रम पाहून काही इतिहासकार त्याला 'भारतीय नेपोलियन्' असें नांव देतात. पण समुद्रगुप्ताच्या पराक्रमाबरोबरच त्याची गाननिपुणता, विद्वत्ता, सदाचरण व उद्दिष्ट कार्यांमधील सफलता इत्यादि गोष्टींनी तो नेपोलियनपेक्षा श्रेष्ठ पुरुष मानावा लागेल !

 अशोकाप्रमागे त्याचे दरबारीं मध्य आशियामधील 'आक्ससू ' नदीच्या खो-यांतील ' कुशान' राजांचे, तसेंच गांधार ( कावूल ) येथील व सिंहलद्वीपमधील राजांचे असे देशोदेशींचे वकील येत असत. नेपाळ, बंगाल, माळवा इत्यादि प्रदेशांतील कित्येक राजे त्याचे मांडलिक होते. युद्धामध्ये जिंकलेल्या राजांना त्याने प्रेमाने वागविलें, पूर्वीच्या पदभ्रष्ट राजांना त्यांची राज्ये पुन्हा मिळवून दिली, त्याच्या मांडलीक संस्थानां- मध्ये कांही संस्थानें प्रजासत्ताकही होतीं, हैं लक्षांत ठेवण्यासासारखें आहे. एकंदरींत दिग्विजय करून कीर्ति मिळविणें हेंच त्याचें ध्येय होतें; असे म्हणण्याला हरकत नाही.

 सर्व हिंदुस्थानभर साम्राज्यसत्ता प्रस्थापित झाल्यानंतर त्याने आपल्या प्रभुत्वाचा निदर्शक असा प्राचीन पद्धतीप्रमाणे 'अश्वमेध' नामक मोठा यज्ञ केला. आर्य लोकांचें ह्या यज्ञसंस्थेवर अतिशय प्रेम होतें. भूतदयेच्या नांवाखाली बौद्ध लोकांनी आर्यांची 'यज्ञसंस्था ' बहुतेक संपुष्टांत आणली होती. परन्तु मधून मधून वैदिक धर्मीच अभिमानी राजे व थोर थोर ऋषि हे निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ करीतच असत. आर्यांच्या सामाजिक जीवनाशीं यज्ञसंस्था कशी निगडित आणि उपयुक्त झाली होती, ह्याविषयी श्री० महादेवशास्त्री दिवेकर एके ठिकाणीं लिहितात-

 "(१) यज्ञसंस्थेमुळे गोत्र-प्रवरांचा सम्बन्ध स्थिर होऊं लागला. (२) यज्ञासाठी अनेक विद्वान् एकत्र जमूं लागले व त्यामुळे तत्त्वज्ञानांत प्रगति