पान:हिंन्दू सम्राट्.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(२८) 

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्.


 लोकांच्या आक्रमणापासून देशाचें रक्षण करण्यांत केला; ही मोठ्या अभिमानाची व आनंदाची गोष्ट होय.

 गुस घराण्यांत अनेक प्रतापी राजे होऊन गेले. त्या सवामध्य सम्राट् समुद्रगुप्स हा पराक्रम व विद्वत्ता वैगर अनेक गुणांमुळे विशेष प्रसिद्ध आहे. गुस-संवत सुरू करणारा चंद्रगुस * (पहिला) हा समुद्रगुप्ताचा पिता असून, चंद्रगुप्स दुसरा ऊर्फ विक्रमादित्य हा समुद्रगुसाचा पुत्र होय.

 अशा प्रतापी सम्राटांच्या मालिकेंत मध्यंतरीं आलेल्या समुद्रगुप्तामुळे गुप्त घराणें पूर्ण तेजाने तळपूँ लागलें, असें म्हणतां येईल. त्याचें तेज आणि कर्तृत्व पाहून तो वडील पुत्र नसून सुद्धा पित्याने त्यालाच 'युवराज ' ठरविलें, असें एका शिलालेखावरून (' अलाहाबाद' अशोकाच्या स्तंभ-लेखाखालील वर्णन ) समजलें आहे. चंद्रगुप्त पहिला ह्याचे पश्चात इसवी सन ३३५ सालों समुद्रगुप्त सिंहासनावर विराजमान झाला.

 सम्राट्अशोकाच्या एका स्तंभलेखाचे खाली गुप्तकालीन असा एक लेख मिळाला आहे. त्यामध्ये पुढील आशयाचा मजकूर आहे-

 '(सारांश) ह्या समुद्रगुप्त राजाने अनेक युद्धांत विजय मिळविले. त्याच्या शरिरावर वीराला भूषण अशा पुष्कळ जखमा दिसतात. गादीवर बसल्यानंतर लौकरच तो दिग्विजयास निघाला. प्रथम छोटानागपूर, गंजम व कोलार हीं स्थलें त्याने र्जिकलीं. नेतर तो दक्षिणेंतील प्रख्यात 'कचोवरम्' शहरीं गेला. तेथील पलुवराजाचा पराभव करून पुढे दिशा बदलून नेल्लोर, देवराष्ट्र (महाराष्ट्र), माळवा अशा मार्गाने परत राज- धानीला गेला. तीन हजार मैलांची ही प्रचंड स्वारी त्याने धडाडीने दोन वर्षांत संपविली. हा राजा संगीतशास्त्रांत निपुण असून प्रजेविषयी कळकळ बाळगीत असे...... ??


  • सेड्युक्सवर विजय मिळवणारा चन्द्रगुप्स (मौर्य)वेगळा होता.