पान:हिंन्दू सम्राट्.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्.

(२७)

(४) सम्राट समुद्रगुप्त.
( इ० स० ३३५ ते ३८० )


 आंध्र देशांतील राजांचें सामर्थ्य कमी झाल्यानंतर उत्तर हिंदुस्थानांत काबूल-पेशावर कडील ' कनिष्क' प्रभृति कुशानवंशीय राजांचा कांही काळ बोलबाला झाला. त्यानंतर इसवी सन २७५ सालीं पाटलिपुत्र ह्या प्रसिद्ध केंद्रस्थानीं 'गुप्त' घराण्याची राजसत्ता स्थापन झाली.

 ऐतिहासिक काळांतील सर्व हिंदु राजघराण्यांमध्ये ह्या 'गुप्त' घराण्या- वर ईश्वराची विशेष कृपा होती, असे म्हणावें लागतें. हिंदुस्थानांतील फार मोठ्या प्रदेशावर सुमारें चारशे वर्षे ह्या वंशाने आपला अधिकार चालविला. ज्याप्रमाणे मोंगल राजघराण्यामध्ये बाबरापासून औरंगजेबा पर्यंत एकामागून एक कर्तृत्ववान् पुरुषांची मालिकाच दिसून येते; त्याच- प्रमाणे 'श्रीगुप्त' राजापासून पुढे ' स्कंदगुप्त' राजापर्यंत गुप्तवंशांतील बलाढ्य राजांची दीर्घ परंपरा हिंदु जातीला लाभली होती. तसेंच थोर थोर हिंदु व्यक्तींना दुर्मिळ असें जें दीर्घायुरारोग्य तेंही बहुतेक गुप्त राजांना लाभले होतें. तुलनेसाठी आमचे मराठी राजे, पेशवे आणि त्यांचे सरदार पहा; तीसचाळीस वर्षांच्या वयांतच त्यांच्या कर्तृत्वाचा ग्रंथ संपावयाचा ! राजकारणाप्रमाणे धार्मिक क्षेत्रांतही प्रकार दिसून येतो. श्रीमत् शंकराचार्य, ज्ञानेश्वर व तुकाराम वगैरे बरीच मंडळी फारच अल्पायुषी झाल्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि विभूतिमत्वाचा फारच थोडा लाभ हिंदु समाजाला होऊं शकला ! असो. प्राप्त झालेल्या सत्तेचा उपयोग सर्व गुप्त राजांनी 'हिंदु' संस्कृतीची सेवा करण्यांत आणि शक- हूणादि