पान:हिंन्दू सम्राट्.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(२६)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्.

 शकांवरील विजयाचेंच स्मारक म्हणतां येईल; परन्तु कांही लोकांच्या मतें त्याचा पुत्र 'पुलुमायी' हाच शककर्ता शालिवाहन होय ! परन्तु 'पुलुमायी' ह्याने शकांवर विजय मिळविल्याविषयी फारसा उल्लेख मिळत नाही. उलट त्याचा सासरा शक राजा 'रुद्रदामा' ह्याने त्याचा पराभव केल्याचा दाखला एके ठिकाणीं मिळाला आहे. ह्या शककल्यांचे नांवाबद्दल अद्याप बराच मतभेद आहे.

 आंध्र देशाच्या ह्या शातकर्णी राजांकडे एक लक्ष पायदळ, दोन हजार घोडेस्वार व एक हजार हत्ती एवढें सैन्य होतें. त्यांनी शक लोकांपासून देशाला होणारा उपद्रव बंद केला आणि या प्रांतांतील आर्यसंस्कृतीचें रक्षण व जोपासना केली. महाराष्ट्रांतील कित्येक सुन्दर लेणीं त्यांच्याच राजवटींत तयार झाली आहेत. विद्वान् लोकांना शातकर्णी राजांनी चांगला आश्रय दिला. 'हाल' नामक सतराव्या शातकर्णी राजाने 'सप्तशती' नामक ग्रंथ लिहिला. आमचा चरित्रनायक हा तेविसावा पुरुष होय. त्यानंतर सत्ताविसावा पुरुष 'श्रीयज्ञशातकणों' हा विशेष कर्तृत्ववान् होऊन गेला. त्याच्या कांही नाण्यांवर जहाजाचे ठसे दिसतात. त्यावरून आंध्रांचा व्यापार व राजकीय वर्चस्वही समुद्रावर व पूर्वेकडील कांही बेटांवर असावें, असें अनुमान आहे. आंध्र प्रांतांतील 'श्रीककुलमू' ह्या शहरांतून 'सुमित्र' नामक धाडशी हिंदु पुरुषाच्या समवेत कांही तेलगु लोक पूर्वेकडील बेटांत गेले होते. त्या 'सुमित्रा' चे नांवावरून एक बेटाला 'सुमात्रा' हें नांव सुमारें दोन वर्षापूर्वीचे आंध्र प्रांतांतील हिंदूंचें हें सीमोलंघन कौतुकास्पद होय !

 सम्राट 'गौतमीपुत्र शातकर्णी 'हा इ० स° १३० सालीं स्वर्गवासी झाला. त्याच मागून त्याचा पुत्र 'पुलुमायी' ( ज्या राजाला इतिहासांत 'वसिष्ठीपुत्र पुलुमायी' म्हणून संबोधिलें जातें, तो ) गादीवर बसला.